Crime…मुंडे चौकात रक्तरंजित थरार..! कुख्यात गुंड पिन्या कापसेवर भरदिवसा जीवघेणा हल्ला..जखमी अवस्थेत अर्धा तास रस्त्यावर पडून
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शेवगाव तालुक्यातील कुख्यात गुंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिन्या कापसेवर भरदिवसा जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.बोधेगाव येथील मुंडे चौक परिसरात काही अज्ञात व्यक्तींनी अचानक हल्ला चढवून त्याच्या पायावर धारदार शस्त्राने वार केले.या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला पिन्या कापसे काही वेळ रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावरच पडून होता.स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
सुमारे अर्धातास जखमी अवस्थेत पडून असलेल्या कापसेला पोलिसांनी तातडीने उपचारासाठी येथील रुग्णालयात हलवले.दरम्यान,हल्ला करणारे संशयित आरोपी घटनेनंतर पसार झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.या घटनेमुळे बोधेगाव परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.
