Crime..तब्बल ७८ लाखांचा कापड अपहार उघड..! राजस्थान पर्यंत पाठलाग करून कापडाचे ४७० रोल जप्त एलसीबीची थरारक कारवाई वाचा सविस्तर…
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर येथून अपहार करण्यात आलेल्या तब्बल 78 लाख 82 हजार 184 रुपयांच्या किमतीचे 470 कापडाचे रोल स्थानिक गुन्हे शाखेने राजस्थान राज्यात धाडसी कारवाई करत जप्त केले आहेत.या कारवाईमुळे आंतरराज्य पातळीवरील आर्थिक गुन्ह्यांचा मोठा पर्दाफाश झाला आहे.या प्रकरणी फिर्यादी अमरिशकुमार ओमप्रकाश गुप्ता (वय 57, रा.अहमदाबाद, गुजरात) यांच्या कंपनीचा माल बेंगलोर येथे पोहोचवण्यासाठी कंटेनर (क्र. GJ-27-J-5935) चालक संजय लिलाधर कुमार व क्लिनर लिलु मीना उर्फ नंदलाल मीना यांच्याकडे सोपवण्यात आला होता.मात्र,विश्वासघात करत आरोपींनी 555 पैकी 470 कापडाचे रोल परस्पर अपहार करून स्वतःच्या फायद्यासाठी वापरले,अशी धक्कादायक बाब उघड झाली.या घटने प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 210/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 316(4), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला.पथकाने नवापुर (जि. नंदुरबार) येथे वाहन उभे करून माल दुसऱ्या वाहनात हलविल्याची माहिती मिळवली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सलग चार दिवस राजस्थानपर्यंत माग काढत तपास सुरू ठेवला.तपासा दरम्यान आरोपींनी माल राजस्थानमध्ये लपवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तत्काळ कारवाई करत खालील तिघांना ताब्यात घेतले :मोहम्मद युनुस सलाउद्दीन (वय 49, ता. सुजानगढ, जि. चुरु),बाबुलाल जीवनराम जाट (वय 32, ता. सुजानगढ, जि. चुरु),मोहम्मद अमिर सज्जाद (वय 33, ता. लक्ष्मणगढ, जि. सिकर) चौकशी दरम्यान त्यांनी मुख्य आरोपी संजय कुमार व लिलु मीना यांनी माल मनोहारठाणा (जि. झालावाड, राजस्थान) येथे लपवून ठेवल्याची कबुली दिली.पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून 78,82,184 रुपयांचा 470 कापड रोलचा मुद्देमाल जप्त केला. हा संपूर्ण माल कोतवाली पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि.संदीप मुरकुटे, सुनिल पवार,रिचर्ड गायकवाड, फुरकान शेख,भगवान थोरात, प्रशांत राठोड,विशाल तनपुरे, महिला पोलीस सोनल भागवत तसेच चालक उमाकांत गावडे, अरुण मोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी कोतवाली पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आला असून,मुख्य आरोपींचा शोध सुरू आहे.
