Cock fighting…कोंबड्यांच्या झुंजीत लाखोची बेटिंग..! पोखर्डी शिवारात LCB चा धाडसी छापा 21 जण जेरबंद
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पोखर्डी शिवारात कोंबड्यांच्या झुंजीच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत तब्बल 21 आरोपींना रंगेहात पकडले.या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.प्राप्त माहितीनुसार,दि.29 मार्च 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पथक एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते.त्यावेळी पोखर्डी गावाच्या शिवारातील पिंपळगाव उजनी रोडवरील मोकळ्या जागेत कापडी मंडप टाकून कोंबड्यांच्या झुंजी लावून त्यावर पैशांचा जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली.या माहितीनुसार सपोनि.हरिष भोये, पोउपनि.अनंत सालगुडे,पोउपनि.समीर अभंग यांच्यासह पोलीस अंमलदार सुरेश माळी,विष्णु भागवत, भिमराज खर्से,प्रशांत राठोड, सागर ससाणे व चालक उमाकांत गावडे यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी छापा टाकला.
छाप्यात कापडी मंडपात सुरू असलेल्या कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांची उधळण करत जुगार खेळणारे इसम आढळून आले. पोलिसांनी तात्काळ सर्वांना ताब्यात घेतले.चौकशीत आरोपींनी आपली नावे पुढीलप्रमाणे सांगितली:शुभम राजेश बोध (27, झेंडीगेट, अहिल्यानगर),आशरफ बाहुला खान (50, आलमगीर), मोहम्मद उस्मान अली शेख (40, मुंबई), अमजद युसुफ मगदुम (43, पुणे), सय्यद अझर अक्तर (40, पंचपीर चावडी), रोहित श्रीचंद गोहिर (33, दरेवाडी), संदीप ओमप्रकाश कुडिया (32, वसंत टेकडी), राम हिरालाल क्षत्रिय (46, नाशिक), तौफिक सिकंदर शेख (28, नेवासा खुर्द), अजहर खुदाबक्श शेख (34, मुकुंदनगर), योगेश मनोहर छजलांनी (40, दरेवाडी), संतोष गणेश गोयल (39, शाहापूर), विकी लक्ष्मण सुजगोहर (46, पुणे), जितेंद्र चंद्रकांत म्हात्रे (40, भिवंडी), अमीन सरदार शेख (42, गजराजनगर), तुषार संतोष मुलतानी (29, पुणे), समीर फिरोज शेख (22, संगमनेर), वसीम सलीम शेख (70, पुणे), गोविंद शाम राजुडिया (63, पुणे), सोहेल कबीर सय्यद (38, मुकुंदनगर) आणि उत्तम एकनाथ साळवे (40, नाशिक).या कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून एकूण 24,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र. नं. 225/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(ब) तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करणाऱ्या अधिनियमांतर्गत कलम 11(इ) व 2(एन) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाणे करीत आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
