Maharashtra247

अवैद्य गौण खनिज उत्खनन व वाहतुकी विरोधात राहुरी तहसील कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) राहुरी तालुका अध्यक्षा स्नेहलताई सांगळे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू

 

राहुरी प्रतिनिधी(दि.१४ मार्च):-अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात कनगर व राहुरी कारखाना एमआयडीसी परिसरातील अवैद्य गौण खनिज उत्खनन व वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या राहुरी तालुका अध्यक्ष स्नेहलताई सुरेंद्र सांगळे यांनी व त्यांच्या शिष्टमंडळाने राहुरीचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते परंतु दिलेल्या निवेदनावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने आज रोजी दि.१४ मार्च रोजी सकाळी ११.वाजे.पासून राहुरी तहसील कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) च्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले आहे.राहुरी तालुक्यातील कनगर व राहुरी कारखाना,एमआयडीसी परिसरात येथील अवैद्य गौण खनिज उत्खन सर्रास सुरू आहे मुरूम,खडी यांची कोणत्याही प्रकारची रॉयल्टी भरलेली नसतानाही गौण खनिज माफीया दिवस रात्र अवैद्य गौण खनिज उत्खनन व वाहतूक करत आहेत.महसूलमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाने गौण खनिज उत्खनन वाहतुकीस बंदी असतानाही मौजे कनगर व राहुरी कारखाना एमआयडीसी परिसरात आदेश धाब्यावर बसवून गौण खनिज उत्खनन व वाहतूक आज तागायात चालू आहेत.तरी प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नसल्याने आम्ही आज रोजी दि.१४ मार्चपासून राहुरी तहसील कार्यालय येथे उपोषणास बसलो आहोत जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका आरपीआय तालुका अध्यक्षा स्नेहल सुरेंद्र सांगळे यांनी घेतली आहे.यावेळी स्नेहल किरण दिवे,रेखा प्रकाश पोपळघट,छाया अशोक गुंजाळ,अर्चना धनवटे,शबाना पठाण,सखुबाई भगत,सरला भगत,आसराबाई जाधव आदीं महिला व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page