गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेला पोलीस हवालदार लाचलुचपत विभागाकडे अखेर शरण;व्हॉइस रेकॉर्डिंग पळून घेऊन गेलेला पोलीस हवालदार एकनाथ निपसे याला न्यायालयाने दिली ४ दिवस पोलीस कोठडी
अहमदनगर प्रतिनिधी (दि.१४ मार्च):-अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार एकनाथ निपसे याच्या विरुद्ध तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून लाचेची मागणी करणे तसेच व्हाईस रेकॉर्डिंग बळजबरीने हिसकावून घेऊन पुरावा नष्ट केला म्हणून 17 फेब्रुवारी 2023 रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरील गुन्हा दाखल झाल्यापासून लोकसेवक पोलीस हवालदार एकनाथ निपसे हा फरार होता.तपासा दरम्यान त्याच्या घरी व मित्रपरिवारांमध्ये त्याचा सतत पोलीस शोध घेत होते परंतु तो मिळून आला नाही.त्याने अहमदनगर विशेष न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडून अटकपूर्व जामीन होऊ नये यासाठी न्यायालयात तीव्र विरोध करण्यात आला.तपासी अधिकारी व जिल्हा सरकारी वकील यांच्याकडून यावेळी सक्षम युक्तिवाद करण्यात आला.आणि पोलीस हवालदार निपसे याला अटकपूर्व जामीन न्यायालयाकडून नामंजूर करण्यात आला त्यानंतर पोलीस निपसे हा लाचलुचपत कार्यालय अहमदनगर येथे स्वतःहजर झाला.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस हवालदार निपसे याला अटक करून पोलीस कोठडी मिळावी म्हणून विनंती रिपोर्टसह 13 मार्च 2023 रोजी अहमदनगर विशेष सत्र न्यायालयात हजर केले असता आरोपी निपसे याला न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस निरीक्षक शरद गोरडे हे करत आहेत.