Maharashtra247

नामांकित कंपनीतून गोण्या चोरी करणाऱ्या आरोपींच्या एमआयडीसी पोलिसांनी आवळल्या एकाच दिवसात मुसक्या;६ लाख ५७ हजार २२५ रूपयांचा मुद्देमाल केला जप्त

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.१४ मार्च):-एमआयडीसी येथील स्पेशालीटी एंटरप्रायजेस लिमीटेड कंपनीमध्ये चोरी करणारे दोन चोरटे जेरबंद,६,५७,२२५ /- रु.किंमतीचा मुददेमाल एमआयडीसी पोलिसांनी जप्त केला आहे. घटनेतील सविस्तर माहिती अशी की दि.१३ मार्च रोजी फिर्यादी नामे राजु लक्ष्मण,रा.रेणाविकर नगर,सावेडी )अहमदनगर यांनी फिर्याद दिली की दि.१२/०३/२०२३ रोजी रात्री ८.०० वा ते दि.१३/०३/२०२३ रोजी सकाळी ८.०० वा चे सुमारास त्यांचे मालकीची कंपनी स्पेशालीटी एंटरप्रायजेस लि. एमआयडीसी येथुन अज्ञात चोरटयाने ८१,७५०/- रु किंमतीच्या ३० गोण्या प्लॅस्टीक दाणा प्रत्येकी २५ किलो प्रमाणे वजनाच्या स्वतःचे आर्थीक फायदयाकरीता चोरुन नेल्या आहेत.त्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुंरनं.२००/२०२३ भादंवि कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे.सदर गुन्हयाचा तपास करत असतांना सपोनि/राजेंद्र सानप यांना गोपनीय माहिती मिळाली की,सदरचा गुन्हा हा आरोपी नामे १) सचिन ठकाराम भगत,रा. सुपा ता.पारनेर,२)पवन शंकर जगताप,रा.शेंडी बायपास रोड,मोहिणीनगर,नवनागापुर ता.जि.अहमदनगर यांनी केला आहे अशी माहिती मिळाल्याने सदर आरोपींना पकडणेकरीता एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करण्यात आले.पथकाने सदर आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे तपासात कबुल केले आहे. आरोपी नामे १) सचिन ठकाराम भगत,वय ३६ वर्षे रा.सुपा.ता. पारनेर,२) पवन शंकर जगताप,वय ३४ वर्षे रा. शेंडी बायपास रोड,मोहिणीनगर,नवनागापुर ता. जि.अहमदनगर यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असुन त्यांचेकडुन ६,५७,२२५/-रुकिंमतीचा मुददेमाल त्यात १)५७,२२५/-रुकिंमतीच्या २१ गोण्या प्लॅस्टीक दाणा २)६,००,०००/-रुकिंमतीचा गुन्हयात वापरलेला टाटा कंपनीचा टॅम्पो नंबर एम.एच.१६.सी.डी.१३२७ जप्त करण्यात आलेला आहे. सदर आरोपी यांना दि. १५/०३/२०२३ रोजी पर्यंत न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करण्यात आलेली आहे.सदरची कामगिरी श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर,श्री. अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/ श्री.राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोस्टे,सफौ/रावसाहेब लोखंडे,चापोहेकॉ/संदिप खेंगट,पोना/मच्छिंद्र पांढरकर,पोना/चांगदेव आंधळे,पोकॉ/ किशोर जाधव,पोकॉ/सचिन हरदास,यांचे पथकाने केलेली आहे.

You cannot copy content of this page