Maharashtra247

H3 N2 (एंफ्ल्यूएंजा) विषाणूमुळे नगर मधील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या युवकाचा मृत्यू;केंद्रीय आरोग्य यंत्रणेने सर्व राज्यांना याबाबत काळजी घेण्याचं आवाहन

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.१५ मार्च):-नगर शहरामधील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका युवकाचा एच 3 एन 2 या विषाणूमुळे बाधित झाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.हा तरुण 23 वर्षीय असून एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होता.त्याला कोरोना विषाणू ने सुद्धा बाधित केलेले होते.त्यानंतर त्याला H 3 N 2 ची लागण झाल्याचे समजत आहे. याबाबत डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचे रक्ताचे नमुने यासह इतर 19 जणांचे रक्ताचे नमुने मुंबईतील अत्याधुनिक वैद्यकीय शाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले असून या तपासणीचा अहवाल आल्यानंतर ह्या तरुणाचा मृत्यू कोरोनामुळे झाला की H 3 N 2 या विषाणूमुळे झाला हे स्पष्ट होणार आहे.मात्र डॉक्टरांना संशय आहे की या तरुणाचा मृत्यू H 3 N 2 या विषाणूमुळे झाला असावा. एकूणच देशांमध्ये आत्तापर्यंत या विषाणूमुळे चार जणांचा बळी गेला असून देशभरात अनेक जण या विषाणूने बाधित झाल्याचे पुढे येत आहे.केंद्रीय आरोग्य यंत्रणेने सर्व राज्यांना याबाबत काळजी घेण्याचं आवाहन केलेले असून योग्य त्या उपाययोजना करण्याचं सांगितलं गेलं आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा असं सांगण्यात आलेले आहे.सर्दी खोकला,प्रचंड ताप,अंगदुखी अशी लक्षणे आहे.अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी असं सांगण्यात आलेला आहे.मात्र एकूणच नगर मधे एका युवकाचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. शक्यतो सर्दी खोकला ताप झालेल्या रुग्णांनी घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

You cannot copy content of this page