अहमदनगर प्रतिनिधी (दि.१५ मार्च):-अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालूक्यात शहापुर व देवगांव शिवारामध्ये बेकायदेशिर गांजा व अफुचे शेतीवर छापा टाकून 14,95,420/-रु. किं.ची 624 लहान मोठी गांजा व अफुचीची झाडे स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केले आहे.बातमीची हकिगत अशी की,दिनांक 14/03/2023 रोजी पोनि/श्री.अनिल कटके,स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की,नेवासा तालूक्यातील शहापुर शिवारामध्ये बाबुराव साळवे व देवगांव शिवारामध्ये रावसाहेब गिलबिले यांनी त्याचे शेतामध्ये बेकायदेशिररित्या गांजा व अफुचे झाडांची लागवड केलेली आहे.अशी बातमी मिळाल्याने सदरची माहिती श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक,अहमदनगर यांना कळवून त्यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि/गणेश वारुळे,सफौ/विष्णु घोडेचोर,पोहेकॉ/मनोहर गोसावी,दत्तात्रय गव्हाणे,संदीप घोडके,देवेंद्र शेलार,पोना/शंकर चौधरी, संदीप दरदंले,पोकॉ/शिवाजी ढाकणे,मपोना/भाग्यश्री भिटे, मपोकॉ/ज्योती शिंदे व चापोहेकॉ/बबन बेरड अशांनी मिळून नेवासा येथे जावून मिळालेल्या माहितीची खात्री करुन,स्थानिक पोलीस,पंच व इतर साधने सोबत घेवुन प्रथम शहापुर, ता.नेवासा येथील बाबुराव लक्ष्मण साळवे यांचे शेतात पहाणी केली असता गव्हाचे शेतामध्ये 2.5 फुट उंचीची दोन व घरा समोर 8 फुट उंचीचे एक गांजाचे झाड तसेच घरा समोर पोत्यावर गांजाचे झाडाचा पाला काढुन तो वाळवण्यासाठी ठेवल्याचे दिसुन आल्यने छापा टाकुन आरोपी नामे 1)बाबुराव लक्ष्मण साळवे याचे कब्जातील शेतामधुन 1,11,420/-रु. किंमतीची तीन गांजाची लहान मोठी हिरवी झाडे कारवाई करुन जप्त करण्यात आलेली आहे.तसेच देवगांव,ता.नेवासा येथे जावुन रावसाहेब भागुजी गिलगिले यांचे शेताची पाहणी केली असता शेतात अफुच्या झाडांची लागवड केल्याचे दिसुन आल्याने छापा टाकुन आरोपी नामे 2)रावसाहेब भागुजी गिलबिले वय 38, रा. देवगांव,ता.नेवासा याचे कब्जातील शेतामधुन 13,84,000/- रु.किंमतीची 69.500 किलो ग्रॅम वजनाची लहान मोठी 621 अफुची झाडे व बोंडे कारवाई करुन जप्त करण्यात आलेली आहे.वरील प्रमाणे नेवासे तालुक्यातील शहापुर येथे कारवाई करुन 1,11,420/-रु. किंमतीची तीन गांजाची लहान मोठी हिरवी झाडे व देवगांव येथे कारवाई करुन 13,84,000/- रु. किंमतीची 69.500 किलो ग्रॅम वजनाची लहान मोठी 621 अफुची झाडे व बोंडे असा एकुण 14,95,420/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन कारवाई बाबत पोना/658 संदीप संजय दरदंले, नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी नेवासा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. 309/2023 एन.डी.पी.एस. कायदा कलम 8 (क), 15, 18, 20 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्रीमती.स्वाती भोर मॅडम,अपर पोलीस अधिक्षक,श्रीरामपूर व श्री. संदीप मिटके,उपविभागीय पोलीस अधिकारी,श्रीरामपूर विभाग अतिरिक्त प्रभार शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

