अहमदनगर प्रतिनिधी (दि.१५ मार्च):-दि.15 जानेवारी 2023 रोजी भाऊसाहेब फिरोदीया वृद्दाश्रम समोरून फिर्यादी यांचे गळ्यातील 20,000/- रू.किंचे सोन्याचे मंगळसुत्र काळ्या मण्यामध्ये ओवलेले 04 ग्रॅम वजनाचे त्यात एक पळी,दोन मोठे व 44 लहान सोन्याचे गोल मनी ओढून चोरून नेले बाबत भिंगार कॅम्प पोस्टे.ला गुरनं/ 24/2023 रोजी भादवि कलम 392 अन्वये गुन्हा रजि.दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपासा दरम्यान आरोपी नामे रियाज फैय्याज इराणी (वय 40 वर्षे रा.वॉर्ड नं 01,नवीन कोर्टासमोर,श्रीरामपुर ता. श्रीरामपुर जि.अहमदनगर)यास अटक करून त्याचे कब्जातून यातील फिर्यादी महीलेच्या गळ्यातील वरील वर्णणाचे सोन्याचे गंठण व मनी जप्त करण्यात आले होते.मा.न्यायालयाचे आदेशाने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक श्री. दिनकर मुंडे यांनी सदर महीलेस बोलावून त्यांचे ताब्यात त्यांचे चोरीस गेलेले 20,000/- रू किं चे सोन्याचे मंगळसूत्र काळ्या मण्यामध्ये ओवलेले 04 ग्रॅम वजनाचे त्यात एक पळी,दोन मोठे व 44 लहान सोन्याचे गोल मनी ताब्यात दिले आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकडे,यांचे मार्गदर्शना खाली भिंगार कॅम्प पोस्टे.चे सहाय्यक पोलीस निरीक्षक/दिनकर मुंडे,पोसई/किरण साळुंके,सफौ/आर.एस वैरागर,पोना/राहुल द्वारके,पोहेकॉ/अजय नगरे यांनी केली आहे.
