जळगाव प्रतिनिधी (दि.१५ मार्च):-अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले व सध्या जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे नियुक्तीस असलेले पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांना जळगाव शहर पोलीस स्टेशन crno-39/22,12(ब) आर्म ॲक्ट 3/25 मधील आरोपी हा त्याच्या मुलाचे खुनातील आरोपीस मारण्याकरिता मा.न्यायालय जळगाव परिसरात मुस्लिम महिलेचा देशात गावठी कट्ट्यासह आला असता त्यास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांनी सिताफिने अटक केली.म्हणून जळगाव पोलीस दलाकडून पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांना प्रशंसापत्रक देऊन गौरविण्यात आले.यावेळी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक ए.राजकुमार,अपर पोलीस अधीक्षक गवळी यांच्या हस्ते हे प्रशंसापत्रक त्यांना देण्यात आले.

