अहमदनगर प्रतिनिधी (दि.१५ मार्च):-दि.०९/०३/२०२३ रोजी रात्री 11.00 वा. कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की,महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा व सुगंधी तंबाखु हे अहमदनगर शहरातील हातमपुरा ते कोठीचौक या रोडने एक चारचाकी ईको गाडीमध्ये गुटका व तंबाखु हे वाहतुक होणार असुन आत्ता सापळा लावल्यास ती मिळुन येईल अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पो.नि.चंद्रशेखर यादव यांचे आदेशाने कोतवाली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोसई/ मनोज कचरे व अंमलदार यांनी हातमपुरा ते कोठी जाणारे रोडवरील दर्ग्यासमोर सापळा लावला असता नमुद ईको गाडी येतांना दिसली असता तीला थांबविले व सदर गाडीची झडती घेतली असता सदर गाडीचे मागील शिटाचे मध्ये दोन पांढ-या रंगाच्या गोण्या दिसुन आल्याने तसेच गाडीतील इसमांस त्यांची नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १)अस्लम गुलाब शेख वय-३२ वर्षे रा.पारनेर जि.अहमदनगर २)साजिद कदीर खान वय-३४ रा.सुपा ता.पारनेर जि.अहमदनगर ३)रणजित नवनाथ परदेशी वय-३६ वर्षे रा.सदर असे असल्याचे सांगीतले त्यांचे कब्जात एकुन मिळालेला माल खालील प्रमाणे
१)७०४०/-रुकिचे २ पांढ-या रंगाच्या गोणीमध्ये केसरयुक्त विमल पानमसाला २२ पॅकेट
२)९६८/-रु किंचा २ पांढ-या रंगाच्या गोणीमध्ये व्ही-१ तंबाखुचे एकुन २२ पॅकेट
३)३,००,०००/-रु किंची एक मारुती सुझुकी कंची सिल्वर रंगाची इको गाडी पासींग क्र एमएच ०३बीई ४५४३ जुवाकिंअं ३,००,८०८/एकुन त्यावरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं । २४४/२०२३ भादवि कलम ३२८,२७२,२७३,१८८,३४ प्रमाणे गुन्हा रजि. दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई/मनोज कचरे हे करत आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/चंद्रशेखर यादव,पोसई/मनोज कचरे,पोहेकॉ/गणेश धोत्रे,पोना/योगेश भिंगारदिवे, पोना/ रियाज इनामदार, पोना/योगेश खामकर,पोना/ सलीम शेख,पोकॉ/अभय कदम,पोकॉ/संदिप थोरात, पोकॉ/अमोल गाढे,पोकॉ/सुजय हिवाळे,पोकॉ/कैलास शिरसाठ,पोकॉ/अतुल काजळे,पोकॉ/सोमनाथ राऊत,पोकॉ/सागर मिसाळ, पोकॉ/गणेश ढोबळे यांच्या पथकाने केली आहे.
