सबमर्सिबल मोटार चोरणारे दोघेजण लातूर मधून जेरबंद नगर तालुका पोलीसांची कारवाई
अहमदनगर प्रतिनिधी (दि.१५ मार्च):-दि 03/03/2023 रोजी सकाळी 11/00 वा चे सुमा नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील नगर कल्याण रोड वरील जखनगावचे शिवारातील कुंदन हॉटेल मध्ये फिर्यादीचे मालकीची SHP ची वेगा कंपनीची विहीरीवरची सबमर्सिबल मोटार ही त्यांनी ठेवलेल्या हॉटेलच्या कंपाऊंड मधुन चोरी गेल्याने फिर्यादी गौरव राम त्र्यंबके(रा.घर नं.14 अ,सरोदे कॉलनी, बालीकाश्रम शाळेमागे, अहमदनगर) यांनी फिर्याद दिल्याने नगर तालुका पोलीस स्टेशन गु.रजि.नं.179/2023 भादवि कलम 379 प्रमाणे दिनांक 08/03/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयाचा तपास करत असताना सपोनि.श्री/ शिशिरकुमार देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्यातील गेलेला माल व अज्ञात आरोपीतांचा शोध घेऊन तांत्रिक बाबीचे विश्लेषन करुन आयशर टेम्पो वरील चालक व त्या सोबत असलेल्या इसमांने सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने व सदर आरोपी व आयशर टेम्पो हा एम.आय.डी.सी लातुर येथे असलेबाबत खात्रीशीर माहीती मिळाल्याने सपोनि/ श्री.शिशिरकुमार देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोसई/ रणजित मारग,तपासी अंमलदार मपोना 2349 जी. व्ही.धनवडे,पोहेकॉ/2065 आर.सी.ससाणे,पोकॉ /896 एस.एस.जाधव असे खाजगी वाहनासह पथक रवाना करुन एम.आय.डी.सी.पोस्टे ता.जि. लातुर येथिल स्थानिक पोलीसांची मदत घेऊन इसम नामे -1)गैयबीसाहब युनुस शेख (वय 21 वर्षे रा.हरंगुळ ता.जि. लातुर) हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस करता त्यांने त्यांचे साथीदार 2)भाऊसाहेब बापु आडे (रा.तळणी तांडा ता. औसा.जि.लातुर) यांचे सह सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केल्याने सदर दोन्ही आरोपी यांना ताब्यात घेऊन गुन्ह्यातील गेला माल 5HP ची वेगा कंपनीची विहीरीवरची सबमर्सिबल मोटार ही आरोपीताने काढुन दिल्याने जप्त करण्यात आली आहे.सदर गुन्ह्यात वापर केलेला आयशर टेम्पो व मोटार असे एकुण 10,10,000 /- रु कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.सदर गुन्ह्यातील आरोपी यांना अटक करण्यात येऊन सदर गुन्ह्याचा तपास हा मपोना 2349 जी.व्ही. धनवडे या करीत आहे.सदरची कारवाई ही श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक अहमदनगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक अहमदनगर व श्री.अजित पाटील उपविभागिय पोलीस अधिकारी,नगर ग्रामीण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.शिशिरकुमार देशमुख, पोलीस उपनिरिक्षक रणजित मारग,मपोना 2349 जी.व्ही. धनवडे पोहेकॉ /2065 आर.सी.ससाणे,पोहेकॉ 679 जे.डी.जंबे,पोना /01आर. एन.शिंदे,पोकॉ /896 एस. एस.जाधव यांनी केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास मपोना 2349 जी.व्ही धनवडे या करीत आहे.