Maharashtra247

एक गावठी कट्टा व चार जिवंत काडतूस बेकायदेशिरित्या कब्जात बाळगणारे दोघे सराईत एलसीबी कडून जेरबंद

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.१६ मार्च):-अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात नान्नज येथुन एक (01) गावठी कट्टा व चार (04) जिवंत काडतुस बेकायदशिररित्या कब्जात बाळगणारे दोन सराईत आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.घटनेतील माहिती आहे की जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी पोनि/श्री.अनिल कटके, स्थागुशा अहमदनगर यांना जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे तसेच फरार व पाहिजे आरोपी बाबत माहिती घेत असताना पोनि/अनिल कटके यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की,गावठी कट्टा व जिवंत काडतुस जवळ बाळगणारे दोन इसम नान्नज शिवारातील नंदादेवी हायस्कुल,ता.जामखेड येथे येणार आहे.आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/अनिल कटके यांनी सदर प्राप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना कळवुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले. नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा पथकातील पोसई/सोपान गोरे,पोहेकॉ/विश्वास बेरड, बापुसाहेब फोलाणे,दत्तात्रय हिंगडे,संदीप घोडके,देवेंद्र शेलार,पोना/शंकर चौधरी, भिमराज खर्से,पोकॉ/विनोद मासाळकर,योगेश सातपुते, चापोहेकॉ/संभाजी कोतकर व चापोना/भरत बुधवंत अशांनी मिळून मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जामखेड-नान्नज रोडवरील,नान्नज शिवारातील नंदादेवी हायस्कुल, ता. जामखेड येथे जावून वेशांतर करुन सापळा लावुन थांबलेले असतांना थोड्याच वेळात बातमीतील वर्णना प्रमाणे दोन इसम संशयीतरित्या फिरताना दिसले.पोलीस पथकाची खात्री होताच पथक संशयीतांना ताब्यात घेण्याचे तयारीत असतांना त्यांना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते पळुन जावु लागले पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांचा पळत जावुन पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले व पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1)हरीष ऊर्फ हरीनाथ सुबराव बिरंगळ वय 42,रा. सोनेगांव,ता.जामखेड व 2) महेंद्र अभिमान मोहळकर, वय 38, रा.नान्नज,ता. जामखेड असे असल्याचे सांगीतले.त्याची अंगझडती घेता हरीष बिरगंळ याचे अंगझडतीमध्ये एक (01) गावठी बनावटीचा कट्टा व महेंद्र मोहळकर याचे अंगझडतीध्ये चार (04) जिवंत काडतूस मिळुन आल्याने दोन्ही आरोपींना नंदादेवी हायस्कुल,नान्नज, ता. जामखेड परिसरात एक (01) गावठी कट्टा व चार (04) जिवंत काडतूस असा एकूण 31,200/- रु. किं.चा मुद्देमाल बेकायदेशिरित्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने सदर बाबत पोहेकॉ/315 विश्वास अर्जुन बेरड ने. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी जामखेड पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन जामखेड पोलीस स्टेशन गु.र.नं. 118/23 आर्म ऍ़क्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व पुढील कायदेशिर कार्यवाही जामखेड पोस्टे करीत आहे.आरोपी नामे महेंद्र अभिमान मोहळकर हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द यापुर्वी अहमदनगर जिल्ह्यात जबरी चोरी व गंभीर स्वरुपाची दुखापत करणे असे एकुण – 5 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1. जामखेड 51/2018 भादविक 394, 34

2. जामखेड 307/2021 भादविक 341, 324, 323, 504, 506, 34

3. जामखेड 109/2017 भादविक 323, 324, 504, 506, 34

4. जामखेड 305/2021 भादविक 326, 232, 504, 506, 143, 147, 149

5. जामखेड 67/2011 भादविक 452, 323, 324, 143, 147, 148, 149, 504, 506, 34

आरोपी नामे हरीष ऊर्फ हरिनाथ सुबराव बिरगंळ हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द यापुर्वी अहमदनगर जिल्ह्यात दुखापत करणे असा गंभीर स्वरुपाचा एक गुन्हा दाखल आहे तो खालील प्रमाणे –

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1. जामखड 21/2013 भादविक 143, 147, 148, 149, 324, 435, 427, 323, 504, 506

सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व श्री. आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी,कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

 

You cannot copy content of this page