Maharashtra247

नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम पाहण्यास आलेला अतिउत्साही प्रेक्षक छतावरून कोसळला 

 

पारनेर प्रतिनिधी (दि.२६ मार्च):-अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील जवळे येथील काही युवकांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला प्रसिध्द नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या नाचगाण्याच्या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जवळे ग्रामपंचायतीच्या दुकान गाळ्यांच्या पत्र्याला मोठे भगदाड पडले आहे व त्यामुळे दुकानातील खुर्च्या व इतर काही साहीत्याचे नुकसान झाल्याचे समजते.गौतमीचा नृत्य कार्यक्रम जवळे येथील बाजारतळावर आयोजित करण्यात आला होता.सध्या गौतमी पाटील हि नृत्यांगना तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली असल्यामुळे जवळे पंचक्रोशितुन मोठ्या संख्येने तरुण व चाहते या कार्यक्रमाला आर्वजुन उपस्थित होते.यावेळी जवळा बाजारतळ पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे काही रसिक प्रेक्षक जागा उपलब्ध नसल्यामुळे आसपासच्या ईमारती,मंदिरे व वेशीवर बसुन कार्यक्रमाचा मनसोक्त आनंदत लुटत होते.कार्यक्रम ऐन जोमात आल्यावर काही अतिउत्साही युवक वेशी शेजारील ग्रामपंचायत जवळे यांनी बांधलेल्या दुकान गाळ्यावर चढले व तिथे उभे राहुन कार्यक्रमाला प्रतिसाद देताना नाचु लागले.परंतु त्यामुळे गाळ्याच्या पत्र्याला मोठे भगदाड पडून एक युवक गाळ्यात खाली कोसळला . नंतर त्याला बाहेर काढण्यात आले.त्यात तो जखमी झाला असुन दुकानातील काही साहीत्याची मोडतोड झाली आहे.दुकानाच्या झालेल्या नुकसानी बाबत दुकानदाराच्या तक्रारीवर ग्रामपंचायत व कार्यक्रमाचे आयोजन यांनी मात्र कानावर हात ठेवले आहेत.त्याच्या भरपाईची कुणीही दखल घेईना,नुकसान झालेल्या दुकानदाराची भरपाईची मागणी आहे.ती ग्रामपंचायत किंवा आयोजकांनी देण्यासाठी अर्जही करण्यात आला आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे . त्यामुळे दुकानदाराला मात्र विनाकारण गौतमीच्या अदांचा नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.

You cannot copy content of this page