संगमनेर प्रतिनिधी (दि.२७ मार्च):-छोटा हत्ती या चारचाकी वाहनातून आलेल्या पाच-सहा जणांनी टोलनाक्यावर टोल भरण्याच्या कारणावरून तलवारीचा धाक दाखवून दहशत निर्माण केल्याची तसेच तेथील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे.नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर मधील हिवरगाव पावसा टोलनाका येथे शनिवारी ता. २५ मार्च रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात पाच-सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.संगमनेर तालुका पोलीस स्टेशन पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉस्टेबल ए.बी. पारधी तपास करत आहेत.
