स्थानिक गुन्हे शाखेची पुन्हा एकदा दमदार कारवाई ६ गावठी कट्टे व १२ जिवंत काडतुस बाळगणारा आरोपी केला जेरबंद
अहमदनगर प्रतिनिधी (दि.२७ मार्च):-जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी कारवाई करत ६ गावठी कट्टे व १२ जिवंत काडतूस जप्त केले आहे.नेवासा तालुक्यातील घोडेगाव शिवारात घोडेगाव-चांदा रोडवर गावठी कट्टे विक्री करण्यासाठी आलेल्या तरूणाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ६ गावठी कट्टे व १२ जिवंत काडतुसे जप्त केले आहेत.रविवारी गुन्हे शाखेने कारवाई करून चार गावठी कट्टे जप्त केले होते,यानंतर पुन्हा सहा गावठी कट्टे जप्त केले आहेत.भैय्या ऊर्फ कयामुद्दीन कुतुबुद्दीन शेख (वय 34 रा.कुकाणा ता. नेवासा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.त्याच्या विरोधात पोहेकॉ/संदीप कचरू पवार ने.स्थानिक गुन्हे शाखा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १४३/२०२३ आर्म ॲक्ट ३/२५,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,श्रीमती स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.संदीप मिटके,स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अनिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सापोनि/गणेश वारुळे,पोहेकॉ/सुनील चव्हाण,संदीप पवार,दत्तात्रय हिंगडे,बापु फोलाणे,संदीप घोडके,देवेंद्र शेलार,पोना/शंकर चौधरी,भिमराज खर्से, रवि सोनटक्के,दिपक शिंदे, पोकॉ/विनोद मासाळकर, योगेश सातपुते,मेघराज कोल्हे,चापोहेकॉ/संभाजी कोतकर व चापोहेकॉ/अर्जुन बडे यांनी केली आहे.