आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण स्थळी दाखल
अहमदनगर प्रतिनिधी (दि.९.डिसेंबर):-अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी-शेवगाव रस्ता रा.मा.क्र.६१ व अहमदनगर-राहुरी-कोल्हार- शिर्डी-कोपरगाव रस्ता रा.मा. १६० व अहमदनगर मिरजगाव चापडगाव- करमाळा-टेंभुर्णी रस्ता रा.म.मा. ५६१ /अ या रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेमुळे मोठ्या प्रमाणवर नागरिक त्रस्त असून रस्त्यातील मोठ मोठ्या खड्यांमुळे अपघात झाले असून, असंख्य प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.याच अनुषंगाने मागील २ ते ३ वर्षापासून पाठपुरवा करून देखील संबंधित अधिकारी यांच्याकडून योग्य ती कार्यवाही केली गेली नाही. त्यामुळे आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.८ डिसेंबर पासून आमरण उपोषण सुरू आहे आज ९ डिसेंबर आहे या उपोषणाचा दुसरा दिवस आहे तरी प्रशासनाने कोणतीही अशी ठोस भूमिका घेतलेली नाही.त्यामुळे आमदार निलेश लंके हे आपल्या भूमिकेवर म्हणजेच आमरण उपोषणावर अद्यापही ठाम आहेत. उपोषणाला वाढता पाठिंबा मिळत आहे त्यातच आज थेट करमाळ्यावरून टायगर ग्रुप चे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रत्यक्ष येऊन आमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला टायगर ग्रुप च्या वतीने पाठिंबा दिला आहे.