आगडगाव ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या सौ.क्रांती रविंद्र शिरसाठ यांची बिनविरोध निवड
आगडगाव ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या सौ.क्रांती रविंद्र शिरसाठ यांची बिनविरोध निवड
अहमदनगर प्रतिनिधी (दि.९.डिसेंबर):-नगर तालुक्यातील आगडगाव येथील २०२२ ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या महिला कार्यकर्त्या सदस्या सौ.क्रांती रविंद्र शिरसाठ तसेच त्यांचे पती रविंद्र शिरसाठ हे वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन पासूनचे फुले शाहू आंबेडकर चळवळीचे सक्रिय उच्च शिक्षित युवा कार्यकर्ते असून वंचितांचे नेते बहुजन हृदयसम्राट आद.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा अकोला पॅटर्न डोळ्यासमोर ठेवून त्यांनी गावाचा विकास व्हावा यादृष्टी नवनविन संकल्पना राबवून एक आदर्श गाव कसे करता येईल या हेतूने त्यांनी ग्रामपंचायत निवडणुक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.यावेळी रवींद्र शिरसाठ म्हंटले की निवडणूक प्रक्रियेत वंचित बहुजन आघाडी अहमदनगर नेते,पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन केले त्यासर्वांचे आभार मानत त्यांना देखील शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे,जिल्हा महासचिव योगेश साठे,शहर महासचिव सचिन पाटील,शहर उपाध्यक्ष प्रवीण ओरे,फिरोजभाई पठाण,अशोक देवढे आदीसह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांच्या हस्ते बिनविरोध निवड झालेले आगडगाव ग्रामपंचायत महिला सदस्य सौ.क्रांती रवींद्र शिरसाठ आणि त्यांचे पती रविंद्र शिरसाठ यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांनी वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा आद.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या वतीने अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.आगडगाव ग्रामपंचायत ही नगर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत मानली जाते या ग्रामपंचायती मध्ये कायम प्रस्थापितांचे वर्चस्व राहिले आहे.आगडगाव पंचक्रोशीतील भटके,आदिवासी वंचितांच्या मुलामुलींसाठी सुसज्य अशी आधुनिक शिक्षण देण्यासाठी शाळा आद.बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात येणार आहे.तसेच जिल्ह्यातील बाकीच्या तालुक्याने ग्रामपंचायती मध्ये उमेदवार दिलेले आहेत काही ठिकाणी सरपंच पदासाठी पॅनल सह उभे करण्यात आले आहे सौ.क्रांती रवींद्र शिरसाठ यांची बिनविरोध निवड ही त्यांच्या साठी प्रेरणा ठरणार आहे. अशी माहिती जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी दिली.