सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर बाजार समितीची नुकतीच निवडणूक होऊन आमदार सचिन कल्याणशेट्टी व दिलीप माने यांच्या कामगिरीवर विश्वास टाकून शेतकरी बांधवांनी 75 टक्के मतदान करून पॅनलला पूर्ण बहुमत दिले व हा पॅनल विजयी झाला.
यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले की सोलापूर बाजार समिती राज्यात आदर्श बाजार समिती करणार आहे,व शेतकरी बांधवांनी ७५ टक्के मतदान आमच्या पदरात पाडून जो विश्वास दाखवला त्यास कधीही तडा जाऊ देणार नाही.यावेळी भाजपा सरचिटणीस व राष्ट्रीय बंजारा सेनेच्या जिल्हाअध्यक्क्षा सुरेखाताई राठोड,बाबुराव चव्हाण (मालक ),शिवाजी राठोड,रमेश गणपत चव्हाण, शंकर यादव,रतिलाल राठोड, संतोष चव्हाण,गणेश शिंदे,भैया शेख,सागर कोळेकर,हुसेन शेख, दिगम्बर जाधव,लक्ष्मण माळी,शेकूम्बर शेख,महादेव खांडेकर,शावराप्पा धुते,बालाजी यादव,रमकाबाई चव्हाण, भाग्यश्री यादव,सुरेखा कोळेकर इत्यादीसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होऊन डोक्यावर गुलाल घेऊन विजयी रॅलीमध्ये सहभागी झाले होते.