अहिल्यानगर (प्रतिनिधी):-कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील हद्दपार प्रस्ताव क्र.13/2024 मधील हद्दपार इसम करण कृष्णा फसले यास उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी दि.22 एप्रिल 2025 रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीतून सहा महिन्यासाठी काढून देण्याचे आदेश दिले आहेत.
आदेश प्राप्त होताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार विशाल दळवी व कर्मचारी यांनी त्याला ताब्यात घेऊन पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलीस ठाणे हद्दीत नेऊन सोडले. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती,कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शोध पथकाच्या महिला पोलीस अंमलदार रोहिणी दरंदले,शिल्पा कांबळे,विशाल दळवी,संदीप पितळे,दीपक रोहकले,तानाजी पवार,सुरज कदम,अभय कदम,शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर,राम हंडाळ, सचिन लोळगे,सोमनाथ केकान,महेश पवार,सोमनाथ राऊत, राहुल मासाळकर,मपोकॉ. प्रतिभा नागरे यांनी केली आहे.