संगमनेर (प्रतिनिधी):- संगमनेर तालुक्यातील काकडवाडी गावचे भूमिपुत्र तसेच रयत शेतकरी संघटनेचे संगमनेर तालुका अध्यक्ष व संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पत्रकार दत्तात्रय घोलप यांचा पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय व कौतुकास्पद कार्याबद्दल आज तळेगाव दिघे येथील संस्कृती मंगल कार्यालयात दे.ना.गोडगे प्रतिष्ठानच्या विविध पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी हास्य विनोदी व निसर्गप्रेमी सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या शुभहस्ते समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी दे.ना गोडगे प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ.नंदकुमार गोडगे,विधीज्ञ अविनाश गोडगे,सिनेअभिनेते बाळासाहेब ढमाले,सामाजिक कार्यकर्ते गणेश दिघे,नंदकुमार दिघे,शरद ढवळे,यांसह मान्यवरांची उपस्थिती होती.समाजसेवक तसेच पत्रकार दत्तात्रय घोलप यांना मिळालेल्या समाजरत्न पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
