माढा (प्रतिनिधी):-विठ्ठलवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची (300) त्रिशताब्दी जयंतीचे आयोजन भाजपा प्रदेश ओबीसी कार्यकारणी सदस्या व महिला मोर्चा अध्यक्षा माढा पूर्व मंडल सौ माया अर्जुन माने यांनी केले होते.यावेळी सौ.माया माने म्हणाल्या की,वंचित दलित व आदिवासी कातकरी यांना शिक्षण व रोजगारासाठी प्रयत्न करणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी वंचितांसाठी राज्य चालवले.
याप्रसंगी सरपंच सौ.मोनिका खरात,ग्रा.प.सदस्य श्री.रामचंद्र भांगे,सुरेश शेंडगे, राजाभाऊ कदम,सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक हनुमंत उबाळे, सुबेदार (से.नि) अर्जुन माने,मेजर बालाजी कदम,सेनेत सध्या कार्यरत असलेले नाईक आकाश खरात,पोलीस पाटील बालाजी शेगर,राजश्री शेंडगे, रंजना कदम,बिनू बरकडे,रमेश बरकडे,तानाजी बरबडे,पुजारी बाळू खांडेकर,सुषमा मोठे, संगीता बरकडे,गणेश सस्ते,दत्तू बरकडे,शिवाजी बरकडे व मोठ्या संख्येने महिला,पुरुष व तरुण वर्गानी उपस्थित दाखवून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या फोटोस पुष्पअर्पण करून अभिवादन केले.