अहिल्यानगर (प्रतिनिधी):- तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी करणारे विधीसंघर्षीत बालके यांच्याकडुन २६,०००/- रु.किं.चे दोन ओपो कंपनीचे मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.याबाबत हकीगत अशी की, दि.३० मेव २०२५ रोजी फिर्यादी नामे अनिल रोहिदास साठे (वय ५५ वर्षे,धंदा नोकरी,रा.सर्जेपुरा, ता.जि अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली की,दि. २७ मे २०२५ रोजी रात्री १०/०० वा.चे सुमारास त्यांनी ओपो कंपनीचे दोन मोबाईल हे त्यांच्या अनुष्का किराणा दुकानामध्ये चार्जिंगला लावले व दुकानाचे शर्टर बन्द करुन कुलुप लावुन घरी झोपण्यासाठी गेले. दि.२८ मे २०२५ रोजी त्यांना ड्युटीला जायचे असल्याने ते पहाटे ०५/३० वा.दुकनाकडे गेले असता त्यांना दुकाने शर्टर अर्धवट उघडे दिसले म्हणून दुकानामध्ये जावून पाहीले असता,दुकानाच्या शर्टरला लावलेले कुलुप बाजुला तुटलेले अवस्थेत पडलेले दिसले,म्हणून त्यांनी दुकानामध्ये जावून पाहिले असता चार्जिंगसाठी लावलेले मोबाईल त्यांना दिसुन आले नाही.
त्यांनी दुकानामध्ये दोन्ही मोबाईलचा शोध घेतला असता त्यांना मोबाईल मिळुन आले नाही.तेव्हा त्यांची खात्री झाली की,कोणीतरी अज्ञात चोरट्याने दुकानाचे शर्टरचे कुलूप तोडुन दुकानामध्ये प्रवेश करुन २६,०००/- रु किं.चे दोन ओपो कंपनीचे मोबाईल चोरुन नेले आहे.त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पो.स्टे येथे गुन्हा रजि नंबर ५९०/२०२५, बी.एन.एस कायदा कलम ३०५ (अ) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर तोफखाना पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांच्या सुचनेप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांनी तात्काळ घटना ठिकाणी जावुन पाहाणी करुन गोपनिय बातमीदार यांना माहिती देवून गुन्ह्याचे चक्रे फिरवली असता गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,सदरचा गुन्हा विधीसंघषीत बालके यांनी केला असल्याची गोपनिय बातमी मिळाल्याने लागलीच विधीसंघषर्षीत बालक यास साधे वेशातील पोलीस अंमलदार यांनी त्यांच्या पालकासह अभिरक्षेत घेवुन त्यास विचारपुस केली असता,त्यांनी नमुद गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडुन २६,०००/- रु.किचे दोन ओपो कंपनीचे मोबाईल गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आले असुन पुढील तपास पो.हे.कॉ.जालिंदर आव्हाड हे करत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती नगर शहर विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक,श्री.आनंद कोकरे,गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील,पो.हे.कॉ.सुनिल शिरसाठ,सुनिल चव्हाण, भानुदास खेडकर,योगेश चव्हाण, अहमद इनामदार,वसिमखान पठाण,पो.कॉ.सुमित गवळी, सुजय हिवाळे,सतिष त्रिभुवन, बाळासाहेब भापसे,सतिष भवर, सुजय हिवाळे,महेश पाखरे, सागर साबळे,भागवत बांगर यांनी केली आहे.