अल्पसंख्यांक समाजातील प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवण्याची इंजि.यश शहा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आग्रही मागणी
अहिल्यानगर प्रतिनिधी:-१८ डिसेंबर रोजी अल्पसंख्यांक हक्क दिन अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.या यावेळी बोलताना इंजिनिअर यश प्रमोद शहा यांनी राज्य सरकारचे जैन आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याबद्दल अभिनंदन केले.
जिल्हाधिकारी सालीमठ तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाचे जैन समाजाच्या वतीने जैन साधु साध्वी भगवंतांना विहार दरम्यान पोलीस सुरक्षा मिळत असल्याबद्दल धन्यवाद दिले.याप्रसंगी शहा यांनी अल्पसंख्यांक बांधवांना येणाऱ्या समस्यांची जाणीव प्रशासनाला करून दिली.एक खिडकी योजना जिल्ह्यात चालू करण्याची आग्रही मागणी केली,जेणेकरून विविध योजनांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होऊ शकेल. तसेच मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळास जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात ऑफिसची जागा नेमून द्यावी जेणेकरून अल्पसंख्यांक समाज बांधवांना महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती घेणे व अडचणी सोडवण्यासाठी संपर्क करणे सुलभ होईल. तसेच विनंती केली की,कर्ज योजनांची माहिती वृत्तपत्रात तसेच सार्वजनिक ठिकाणी, धार्मिक स्थळाच्या ठिकाणी बॅनरद्वारे लावण्यात यावे जेणेकरून योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
याच बरोबर बँक अधिकाऱ्यांची कर्ज प्रकरणा संदर्भात एकत्रित मीटिंग बोलवावी जेणेकरून अडचणी तात्काळ सुटू शकतील.तसेच शिक्षण विभागास माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व मुख्याध्यापकांची एकत्रित मीटिंग घ्यावी व शाळा कॉलेजमध्ये दर्शनी भागी अल्पसंख्यांक योजना संदर्भातील पत्रक माहिती लावण्यात यावे अशी सूचना करावी असे सांगितले.तहसील कार्यालयातील उत्पन्न व इतर दाखले लवकरात लवकर विद्यार्थ्यांना मिळावेत.शहरातील अल्पसंख्यांक बांधवांसाठी उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहाचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे ते लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी द्याव्या अशी विनंती केली.यासोबतच अल्पसंख्यांक समाजातील विविध धार्मिक स्थळांना जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन व सामाजिक प्रतिनिधी यांनी एकत्रित सर्व ठिकाणी भेटी द्याव्यात जेणेकरून सामाजिक सलोखा जिल्ह्यात चांगल्या प्रकारे जपला जाईल.
पंतप्रधान 15 सूत्री योजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात तीमाही मीटिंग घेण्यात यावी जेणेकरून प्रशासना संबंधित अडचणी त्यात तात्काळ सोडवता येतील.अशा विविध समाजातील अडचणी यश यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.या सर्व बाबींवर माननीय जिल्हाधिकारी सालीमठ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की शहा व इतर प्रतिनिधींनी मांडलेल्या मुद्द्यांची नोंद प्रशासनाच्या वतीने मी स्वतः तसेच सर्व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे.
त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देखील शिक्षण विभाग, मौलाना आर्थिक विकास महामंडळ, पोलीस प्रशासन व इतर संबंधितांना तात्काळ दिल्या.तसेच तीमाही मीटिंग देखील घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.अतिशय सकारात्मक प्रतिसाद जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिला .अतिशय सकारात्मक वातावरणात जिल्हाधिकारी कार्यालयात मीटिंग संपन्न झाली.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर,तहसीलदार घोरपडे,शिक्षण विभागाचे दरेकर,शेख, मौलाना आझादच्या सौ.गोरे व पटेल,जिल्हा नियोजन अधिकारी दिपक दातीर, महापालिका उपायुक्त प्रियांका शिंदे,जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे,अल्पसंख्यांक समाज प्रतिनिधी इंजिनिअर यश शहा,पायल शहा,सय्यद वाहब,हरजीतसिंग वधवा,सैय्यद अफजल व इतर उपस्थित होते.