राज्यात प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा जप्त दोघांवर गुन्हे दाखल भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई
अहील्यानगर प्रतिनिधी:-राज्यात प्रतिबंधीत केलेला नायलॉन मांजा घरात बाळगताना दोघांना मुद्देमालासह भिंगार कँम्प पोलीसांनी जेरबंद केले आहे.सुमित संतोष हळगावकर रा.दाणेगल्ली भिंगार,ता. जि.अहिल्यानगर,गुलाब समिर शेख रा.वाघस्कर गल्ली,भिंगार,ता.जि. अहिल्यानगर असे पकडलेल्या युवकांचे नावे आहेत.
पोलीसांनी छापा टाकुन 46,000/- रु कि.च्या एकुन 46 नायलॉन मांजाचे रिळ त्यावर इंग्रजीमध्ये MONO KTCFIGHTER असे इंग्रजी नाव असलेले प्लॅस्टीकचे सिलबंद असलेली प्रत्येकी 1000/-रु.कि.जप्त करुन कॅम्प पोलीस स्टेशन येथे गु.र.नं 821/2024 भा. न्या.सं.क 223,125 सहपर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 5,15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोना.शाहीद शेख हे करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर भाग अहिल्यानगर अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे,पोहेकॉं. दिपक शिंदे,रवी टकले, पोकॉ.प्रमोद लहारे, अमोल आव्हाड यांनी केली आहे.