शहरातील व्यापाऱ्यास जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणारे दोघे जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई;बनावट आधारकार्डचा वापर करून खरेदी केले होते सिमकार्ड
अहिल्यानगर प्रतिनिधी:-बनावट आधारकार्डचा वापर करून खरेदी केलेल्या सीमकार्डद्वारे शहरातील प्रतिष्ठीत व्यापाऱ्यास जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणारे 2 आरोपीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळाले आहे.
बातमीची हकिगत अशी की,दि. 14/ डिसेंबर 2024 रोजी फिर्यादी श्री.किरण मोहनलाल राका (वय 56,धंदा व्यापार, रा.आदर्श कॉलनी, अहिल्यानगर) हे सर्जेपुरा येथून घरी जात असताना यातील अज्ञात आरोपीतांनी मोटार सायकलवर येऊन, फिर्यादीस आडवून भाई का फोन आयेगा उठालो असे म्हणुन निघुन गेले.त्यानंतर फिर्यादीचे मोबाईलवर मेसेज पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली.याबाबत तोफखाना पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 1318/2024 बीएनएस कलम 126 (2), 351 (2) (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
शहरातील व्यापाऱ्यास दिलेल्या धमकी प्रकरणी प्राथमिक माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना या गुन्हयांचा समांतर तपास करणेबाबत आदेशीत केले.नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी अशांचे पथक नेमुण गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले.तपास पथकाने घटना ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे आरोपीतांचा अहिल्यानगर शहरामध्ये शोध घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नमूद गुन्हयातील संशयीत आरोपी हे रामवाडी रोड,तारकपूर येथे विना क्रमांकाचे ॲक्टीव्हा मोटार सायकलसह थांबलेले आहेत.मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकाने रामवाडी रोडवर संशयीत विनाक्रमांकाचे ॲक्टीव्ही गाडीवरील इसमास शोध घेऊन ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी नाव अजय अरूण साळवे,रा.माधवबाग, आलमगीर,भिंगार,पवन प्रमोद उघडे,रा.घर नं.79,सदरबाजार, भिंगार असे असल्याचे सांगितले.पथकाने पंचासमक्ष आरोपीची अंगझडती घेऊन, आरोपीचे ताब्यातून 82,000/-रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यात एक ग्रे कलरची ॲक्टीव्हा, नोकीया व जिओ कंपनीचे मोबाईल, विजय अरूण नवगिरे याचे आधारकार्ड पॅनकार्ड व बॅक पासबुक,एक रबरी स्टॅम्प,अनोळखी इसमाचे फोटो असा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
ताब्यातील आरोपी अजय अरूण साळवे यास विश्वासात घेऊन विचारपुस केली असता, त्याने खोटया कागदपत्रांचा वापर करून दिपक राजु भुजबळ,रा.घासगल्ली, कोठला,अहिल्यानगर याचे विजय अरूण नवगिरे,रा.कल्याण रोड, शिवाजीनगर या नावाने बनावट कागदपत्राच्या आधारकार्ड तयार केले. त्या बनावट आधारकार्डच्या आधारे वेगवेगळी कागदपत्रे तयार केली.आरोपी अजय साळवे याने व्यापारी किरण राका यांचे कडून खंडणी वसुल करण्याचे उद्देशाने बनावट कागदपत्रावरून त्याने नवीन सिमकार्ड घेतले.आरोपी पवन प्रमोद उघडे याचेसह ॲक्टीव्ही मोटार सायकलवर जाऊन फिर्यादीस आडवून धमकावले व नंतर त्यांचे कडील नोकीया मोबाईलद्वारे फिर्यादीस यांना खंडणी मागण्याकरीता धमकी दिल्याची माहिती सांगीतली.ताब्यातील आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन हे करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार संदीप पवार,संतोष खैरे,सागर ससाणे,रविंद्र घुंगासे, मेघराज कोल्हे,प्रशांत राठोड व महादेव भांड यांनी केलेली आहे.