Maharashtra247

संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी वंचित बहुजन आघाडीची मागणी 

 

 

परभणी प्रतिनिधी:-परभणी येथे दि.10 डिसेंबर 2024 रोजी एका माथेफिरू माणसाने ज्या भारतीय संविधानाच्या जीवावर आपले अस्तित्व आहे.देश आहे त्या भारतीय संविधानाच्या प्रतीकृतीचा अपमान केला तोडफोड केली.या घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करून त्या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी व त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूर्णा तहसीलदार यांच्या मार्फत देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान,राज्याचे मुख्यमंत्री,गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या महिला शहर उपाध्यक्षा सुकेशनी संभाजी गोधने,ॲड.सिद्धांत गायकवाड,अर्जुन लक्ष्मण मुधळकर, अनिल नरवाडे,कुंदन राणा ठाकूर,श्याम सुंदर काळे,संदीप खंडागळे, विजय खंडागळे,संजय वाघमारे,राहुल धबाले व सर्व सामाजिक व राजकीय संघटनेमार्फत निवेदन देण्यात आले.

You cannot copy content of this page