सोयाबीनच्या ९० गोण्या व गॅसच्या टाक्या चोरणारी टोळी जेरबंद पोलीसांनी आरोपींना असे घेतले ताब्यात
अहील्यानगर प्रतिनिधी:-जामखेड तालुक्यात सोयाबीन चोरीचे गुन्हे करणारे धाराशिवचे 8 आरोपी जेरबंद करून आरोपीकडून 5 गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा व खर्डा पोलीस स्टेशनला यश आले आहे.
बातमीची हकिगत अशी की,दि.01 डिसेंबर 2024 रोजी फिर्यादी श्री.बाळु महादेव गिते, (रा.आनंदवाडी, ता.जामखेड) यांचे पत्र्याचे शेडमधुन अज्ञात चोरटयांनी 35 सोयाबीनच्या गोण्या व 5 इंडीयन कंपनीच्या गॅस टाक्या फिर्यादीचे संमती शिवाय स्वत:चे आर्थिक फायदयाकरीता चोरून नेल्या आहे.याबाबत खर्डा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 195/2024 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता..
श्री.राकेश ओला, पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना चोरीचे उघडकीस न आलेले गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते.नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री.आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांनी पोसई/अनंतर सालगुडे व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे,विश्वास बेरड,गणेश लोंढे,हृदय घोडके,ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख,संतोष लोढे,अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, आकाश काळे,रोहित येमुल,रोहित मिसाळ, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे,भाग्यश्री भिटे,सारिका दरेकर, उमाकांत गावडे,अरूण मोरे व खर्डा पोलीस स्टेशन नेमणुकीचे पोलीस अंमलदार रईस सय्यद,संभाजी शेंडे, संदीप धामणे,प्रविण थोरात,शशी म्हस्के, आनंद धनवडे,धनराज बिराजदार,राहुल शिंदे, वैजिनाथ मिसाळ,पंडीत हबर्डे व अशोक बडे अशांचे संयुक्त पथक नेमुण गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले.तपास पथक खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हयातील चोरीस गेला माल व आरोपीची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा इसम नामे दादासाहेब शामराव शिंदे,रा.मांडवा, ता.वाशी,जि.धाराशिव याने त्याचे साथीदारासह केला असुन तो त्याचे साथीदारासह मांडवा, ता.वाशी येथे आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने मांडवा,ता.वाशी येथे संशयीत इसमास शोध घेऊन ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी नाव दादाराव शामराव शिंदे,वय 50,अनिल भिमराव शिंदे वय 53,संजय सुभाष पवार, वय 30,सुनिल भिमराव शिंदे,वय 36,विशाल दादाराव शिंदे वय 22,शंकर विलास शिंदे, वय 35,आदिनाथ आबा शिंदे वय 50 सर्व रा.मांडवा, ता.वाशी, जि.धाराशीव व शंकर लगमन काळे, वय 42, रा.कन्हेरवाडी, ता.कळंब, जि.धाराशिव असे असल्याचे सांगितले.आरोपीकडे वर नमूद गुन्हयांचे अनुषंगाने विचारपुस करता त्यांनी नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली.तसेच जामखेड तालुक्यातील नागेबाची वाडी, नायगाव,झिक्री व राजुरी येथुन सोयाबीणच्या गोण्या चोरून नेलेबाबतची माहिती सांगीतल्याने खर्डा व जामखेड पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील खालीलप्रमाणे 05 चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1 खर्डा 195/2024 बीएनएस 303(2)
2 खर्डा 197/2024 बीएनएस 303(2)
3 खर्डा 198/2024 बीएनएस 303(2)
4 जामखेड 623/2024 बीएनएस 303(2)
5 जामखेड 632/2024 बीएनएस 303(2)
तसेच ताब्यातील आरोपीकडे चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत विचारपुस केली असता, आरोपीतांनी गुन्हयातील चोरून नेलेल्या 90 सोयाबीनच्या गोण्या या ईटकुर,ता.कळंब, जि.धाराशिव येथील व्यापाऱ्यास विकल्याची माहिती सांगीतली. तपास पथकाने पंचासमक्ष आरोपीतांनी गुन्हयांत वापरलेले वाहन 5,00,000/- रू किंमत वाहन क्रमांक एमएच-12-सीआर-8820 व ईटकुर, ता.कळंब, जि.धाराशिव येथून 1,29,000/- रूपये किंमतीच्या 90 सोयाबीनच्या गोण्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी खर्डा पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशन हे करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.