अहील्यानगर प्रतिनिधी:-संगमनेर शहरातील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत 2 लाख 20,000/-रू. किं.मुद्देमाल जप्त करून एकूण 21 गोवंश जनावरांची सुटका केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयावर कारवाई करत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जमजम कॉलनी,जुना जोर्वे रोड,संगमनेर, जि.अहिल्यानगर येथील काटवनात सलमान मणियार,रा.संगमनेर याने गोवंशी जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने डांबुन ठेवलेले आहेत.
तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष बातमीतील ठिकाणी जोर्वे रस्ताच्या कडेला काटवनात जाऊन खात्री करता एक इसम गोवंश जातीचे जनावरे निर्दयतेने बांधुन ठेवत असताना मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सलमान हारून मणियार (वय 33, रा.खोजे गल्ली, मोमीनपुरा,संगमनेर, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर) असे असल्याचे सांगीतले. तसेच डांबून ठेवलेल्या जनावरांबाबत विचारपूस करता त्याने सदरची जनावरे ही स्वत:चे मालकीचे असल्याचे सांगीतले.पथकाने घटना ठिकाणावरून 2,20,000/-रू.किंमत त्यात 4 गायी,3 गोवंश जातीचे गोऱ्हे व 14 गोवंश जातीचे वासरे असा मुद्देमाल जप्त केला आहे.या आरोपी विरूध्द संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 1051/2024 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारीत 2015 चे कलम 5 (अ), 1, 9 सह प्राण्यांना निदर्यतेने वागविण्याचा कायदा कलम 3,1 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधिक्षक,श्रीरामपूर,श्री. कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर उपविभाग,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथकातील पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे,अमृत आढाव,रणजीत जाधव, बाळासाहेब गुंजाळ यांनी केलेली आहे.