उपनगरातील भिस्तबाग चौकात ट्रॅफिक पोलिसांची नेमणूक करा मा.नगरसेविका वीणा बोज्जा यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पत्रकाद्वारे मागणी
नगर प्रतिनिधी (दि.९. डिसेंबर):-सावेडी उपनगरातील भिस्तबाग चौक हा सर्वात मोठा राहदारीचा चौक असून या चौकात रस्त्याच्या चारही बाजूने मोठया प्रमाणात वाहतूक होत असल्यामुळे या चौकात ताबडतोब ट्रॅफिक पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी मा.नगरसेविका सौ.वीणाताई बोज्जा यांनी एका पत्रकानव्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.सध्या या चौकाची परिस्थिती अत्यंत भयानक झालेली असून प्रोफेसर चौकातून येणारी वाहतूक, मनमाडरोड ने येणारी वाहतूक तसेच पाईपलाईन रोड व भिस्तबाग महालरोड वरून येणारी वाहतूक याच चौकात मिळत असल्यामुळे सकाळी व संध्याकाळी मोठया प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते.छोटे मोठे अपघात हे नित्याचेच झालेले असून वाहतूक पोलीस नसल्यामुळे कोणताही वाहन चालक शिस्त पाळत नाही.तसेच या भागात क्लासेस मोठया प्रमाणात असल्यामुळे शाळा कॉलेजची मुले मुली वाहनांची कोणताही वेगाचे भान न ठेवता जोरात गाड्या चालवीतात त्याचाच परिणाम अपघातात दिसून येतो. मध्यंतरी सोनानगर चौकात एका युवकाला जीव गमवावा लागला.या चौकात भाजी वाले,रिक्षावाले व इतर लोकांचे मोठया प्रमाणात अतिक्रमण असल्यामुळे चौक अरुंद झाला असून त्यात ट्रॅफिक पोलीस नसल्यमुळे वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच झाली आहे.या कोंडीमुळे महिला व मुलींना या चौकातून गाडी चालवणे तर अवघडच आहे.वरील गंभीर परिस्तिथीची विचार करून या चौकात कोणाच्याही मरणाची वाट न पाहता त्वरित ट्रॅफिक पोलिसांची नेमणूक करून या भागातील नागरिकांच्या वाहतुकीची काळ्जी घ्यावी असे आवाहन मा.नगरसेविका सौ.वीणाताई बोज्जा यांनी केले.