Social work…त्याग,संघर्ष आणि प्रेरणेचे प्रतीक माता रमाई आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन..शहरात भव्य स्मारकासाठी मनपा आयुक्तांकडे मागणी करणार रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र
छत्रपती संभाजीनगर (दि.७ फेब्रुवारी):-त्यागमूर्ती,संघर्षशील आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेल्या माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रच्या वतीने शहरातील त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पक्षप्रमुख राजूभाई साबळे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी कार्यामागे माता रमाई आंबेडकर यांचा अमूल्य त्याग, संयम आणि खंबीर साथ होती, अशा शब्दांत त्यांच्या जीवनकार्याला उजाळा दिला. सामाजिक अन्याय, दारिद्र्य आणि अपार कष्टांचा सामना करत त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याला बळ दिले. माता रमाईंचे जीवन हे केवळ कुटुंबापुरते मर्यादित न राहता संपूर्ण समाजासाठी प्रेरणास्थान ठरले असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या अभिवादन कार्यक्रमात रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रच्या वतीने एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी घोषणा करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहरात माता रमाई आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, यासाठी महानगरपालिका आयुक्तांकडे लवकरच अधिकृत मागणी सादर केली जाणार असल्याची माहिती पक्षप्रमुख राजूभाई साबळे यांनी दिली. माता रमाई आंबेडकर यांचे संघर्षमय जीवन, त्याग आणि सामाजिक योगदान भावी पिढीपर्यंत पोहोचावे, यासाठी शहरात स्मारक उभारणे अत्यावश्यक असल्याचा सूर याप्रसंगी उपस्थितांनी लावला.
या कार्यक्रमास रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे पक्षप्रमुख राजूभाई साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महाराष्ट्र उपाध्यक्ष ॲड. अविनाश थिट्टे, मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, जिल्हाध्यक्ष दिनेश गवळे, जिल्हा उपाध्यक्ष अरशाद लखपती, नवीन शहराध्यक्ष संतोष उनवणे, राहुल गाडेकर, ऑटो युनियन शहराध्यक्ष प्रदीप धनेधर, शहर उपाध्यक्ष अनिस गंगापूरकर, विशाल गाडे, रवी बनसोडे, संजय पांडव, अशोक साळवे, दिनेश साळवे, अशोक गायकवाड, बबलू बलखंडे, विभाग प्रमुख कलीम पटेल, गणेश दाभाडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रमात माता रमाई आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला असून, त्यांच्या विचारांचा आणि संघर्षाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
