येथे शिकारीच्या नादात बिबट्या अडकला कोंबड्यांच्या खुराड्यात
संगमनेर प्रतिनिधी (दि.९.डिसेंबर):-अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील सारोळे पठार येथे भक्ष्याच्या शोधात बिबट्या खुराड्याजवळ आला.कोंबड्यांच्या शिकारीचा मोह त्याला आवरला नाही.शिकारीच्या नादात बिबट्या खुराड्यात अडकला.वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पहाटे बिबट्याला अर्धवट बेशुद्ध करून पिंजऱ्यात जेरबंद केले.येथील घनश्याम भागाजी फटांगरे यांच्या वस्तीवर गुरुवारी (दि.८) पहाटे तीनच्या सुमारास पाळीव कोंबड्यांच्या लोखंडी खुराड्यात बिबट्याने प्रवेश केला.मात्र,त्याच वेळी दरवाजा बंद झाल्याने खुराड्यात तो अडकला.फटांगरे यांना आवाजाने जाग आली.त्यांनी याची माहिती वन विभागाला दिली.वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला बेशुद्ध करून पिंजऱ्यात टाकले दरम्यान बिबट्याने अनेक दिवसांपासून परिसरात धुमाकूळ बिबट्या जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.