अहिल्यानगर (प्रतिनिधी):-चैन स्नैचिंग करणाऱ्या आरोपीस तोफखाना पोलीसांनी जेरबंद करत त्याच्याकडून एक महागडी मोटार सायकल व १ लाख ७०,०००/- रु.किं.चे सोन्याचे दागिने जप्त केले आहे.अहिल्यानगर शहरात स्वामी समर्थ मंदिराजवळ व डि-मार्टच्या मागील गेटवर अशा दोन ठिकाणाहुन महिलाच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दोन इसम मोटार सायकलवर भरधाव वेगात महिलांच्या जवळ येवुन त्याच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने ओढुन तोडुन हिसका मारुन घेवुन गेल्याबाबत तोफखाना पो.स्टे येथे गु.रजि नं. ३४६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे अज्ञात दोन इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर तोफखाना पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांच्या सुचनेप्रमाणे गुन्हे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील व गुन्हे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी तात्काळ घटना ठिकाणी जावुन फिर्यादी याच्यासोबत चर्चा करुन आरोपीचे वर्णन व माहिती घेवुन शोध सुरु केला. मिळालेल्या माहितीच्या आधारे एक संशईत आरोपी यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने सुरुवातील काही एक माहिती दिली नाही,परंतु त्यास पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याची कबुली देवून त्याच्याकडुन ७०,०००/- रु कि.ची एक बजाज कंपनीची प्लसर मोटार सायकल व १,१०,०००/- रु कि.ची सोन्याचे दागिने असा एकुण १,७०,०००/- रु किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे, सपोनि.उज्वलसिंह राजपुत,गुन्हे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पो.हे.कॉ.सुनिल शिरसाठ,सुनिल चव्हाण,योगेश चव्हाण, वसिमखान पठाण,अहमद इनामदार,भानुदास खेडकर,सुधीर खाडे,सुरज वाबळे,पो.कॉ सुमित गवळी, सतिष त्रिभुवन,सुजय हिवाळे, सतिष भवर,महेश पाखरे यांनी केली आहे.