नेवासा प्रतिनिधी (किरण लुंगसे ):-नेवासा तालुक्यात सोनई खरवंडी रोड येथे राहणाऱ्या 20 वर्षीय युवक लखन मच्छिंद्र सावंत याला घरी कुणी नसल्याचा फायदा घेत दि.2 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास त्याच्या घराशेजारी राहणारे सुनील भिमराव शिंदे,अनिल नाथा शिंदे,हौसाबाई नाथा शिंदे,नाथा बाबुराव शिंदे या गुंडांनी विटा,तलवारी,दांडे,यांनी बेदम मारहाण करीत जखमी केले आहे.
याबाबत सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी आद्यपही राजरोसपणे परिसरात कोणतीही भीती न बाळगता फिरत आहे.व पीडित तरुण मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने अद्यापही जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहे.पीडित युवकाचे वडिल मच्छिंद्र विठ्ठल सावंत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दि.4 एप्रिल रोजी निवेदन दिले आहे, दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,या चारही आरोपींवर 307 प्रमाणे वाढीव कलम दाखल करण्यात येऊन त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी व या मारहाणीत माझ्या मुलाच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चैन व अर्ध्या तोळ्याचे सोन्याचे लॉकेट या चौघा आरोपीनी हिसकावून नेले आहे,त्याची चौकशी करून तें पुन्हा आम्हाला मिळण्यात यावे,तसेच यातील आरोपींची मावशी,मुलगा विशाल दादाहरी शिंदे व मामा दया शिवराम सावंत यांनी आम्हाला धमकी दिली आहे की,मी माझ्या बहिणीच्या मागे भक्कमपणे उभा आहे.कोणतेही पोलीस माझे काहीच वाकडे करू शकत नाही मी तुम्हाला लवकरच जीवे ठार मारणार आहे.अशी धमकी दिल्याने माझे कुटुंब अत्यंत भयभीत झाले आहे.त्यामुळे या सर्व आरोपीं कडून माझ्या कुटुंबीयांना धोका निर्माण झाला आहे आमच्या जीवितास कुठलीही जीवित हानी झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार यातील आरोपी व त्यांचे मामा दया शिवराम सावंत राहतील.तरी कृपा करून आपण याची गांभीर्याने नोंद घ्यावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनात पीडित मुलाच्या वडिलांनी केली आहे.