नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णकृती पुतळा समितीच्या वतीने मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देताना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्ण कृती पुतळा समितीचे पदाधिकारी समवेत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहिल्यानगर शहरात सिद्धार्थ नगर येथे अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धकृती पुतळा आहे परंतु आता पूर्णकृती पुतळा उभारण्यात यावा तसेच अहिल्यानगर शहर हे अण्णाभाऊ साठे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले असल्याने या शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा भव्य दिव्य जागेत सुशोभीकरण करून उभारण्यात यावा अशी मागणी सर्व समाज बांधवांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.