आयपीएल क्रिकेटवर ऑनलाईन बेटींग (सट्टा) घेणाऱ्या युवकास स्थानिक गुन्हे शाखेने पकडले
अहमदनगर प्रतिनिधी (दि.२७ एप्रिल):-आयपीएल क्रिकेटवर ऑनलाईन बेटींग (सट्टा) मोबाईलवरुन घेणारा नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा,येथील एकास 13,000/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.घटनेतील हकीकत आशिकी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर हे अवैध धंद्यांची माहिती घेत असताना गुप्तबातमीदाराकडून माहिती मिळाली की,माळीचिंचोरा, ता.नेवासा येथे इसम नामे साजिद पठाण हा माळी चिंचोरा फाटा,ता.नेवासा येथे उघडयावर बसुन त्याचे मोबाईल फोनवर ऑनलाईन साईटवर आयपीएल क्रिकेट मॅचवर बेकायदा पैसे लावुन सट्टा खेळत व खेळवित आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/मनोहर गोसावी,संदीप पवार,पोना/सचिन आडबल,पोकॉ/शिवाजी ढाकणे,रणजीत जाधव अशा पोलीस अंमलदारांचे पथक नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले.पथकातील पोलीस अंमलदार यांनी पंचाना सोबत घेवुन बातमीती माळी चिंचोरा फाटा,ता.नेवासा या ठिकाणी जावुन खात्री केली असता एक इसम उघडयावर बसुन त्याचे मोबाईल फोनवर काहीतरी खेळताना व वहीमध्ये आकडेमोड करताना दिसला पथकाची खात्री होताच त्यास जागीच पकडुन पोलीस पथक व पंचाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1)साजिद उस्मान पठाण,वय 32,रा.वडाळा बहिरोबा,ता.नेवासा असे असल्याचे सांगितले.सदर इसमाचे हातातील वही व मोबाईलची पहाणी केली असता त्याचे मोबाईल फोनमध्ये आयपीएल किकेट मॅचवर सट्टा लावुन गेम खेळत असल्याचे दिसुन आल्याने त्यास हातातील वही व मोबाईल फोनसह ताब्यात घेतले.ताब्यातील इसमाची पंचासमक्ष अंगझडती घेता त्याचे अंगझडतीत 13,000/- रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनी ऍ़न्ड्रॉईड मोबाईल,रोख रक्कम व आकडेमोड केलेली वही मिळुन आल्याने जप्त करुन आरोपी विरुध्द पोना/सचिन दत्तात्रय आडबल,ने. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे फिर्यादीवरुन नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. ाा 481/2023 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील कायदेशिर कार्यवाही नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व श्री.अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.