जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून सहा महिन्यापासून फरार असलेल्या तिघांना तोफखाना पोलिसांनी केले जेरबंद
अहमदनगर प्रतिनिधी(दि.२७ एप्रिल):-जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे तसेच ६ महिन्यापासुन फरार असलेल्या तिघांना तोफखाना पोलिसांनी पकडले.तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. ९८४ / २०२३ भा.द.वि.कलम ३०७, ३२३,५०४,५०६ प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी नामे सागर एकनाथ अवसरे (वय २६ रा.रेणावीकर कॉलनी निर्मलनगर) याने यातील आरोपी यांना उधारीचे पैसे मागीतल्याचे कारणावरुन आरोपींनी लोखंडी कोयत्याने फिर्यादीला मारहाण करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.यातील आरोपी नामे १)आकाश संजय जाधव वय २४ वर्षे २) साहील बाळू शिंदे वय २० वर्षे ३)शरद उत्तम फुलारी वय २९ वर्षे रा.गुंडू साडी गोडाऊन जवळ,सावेडी अहमदनगर हे तपोवन रोड येथे येणार असल्याची बातमी तोफखाना पोलीस स्टेशन निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाल्याने त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला माहिती देऊन कारवाई करण्यास लावले.गुन्हे पथकाने त्या ठिकाणी सापळा लाऊन दि.२६ एप्रिल रोजी रात्री ९.०० वाजता या आरोपींना अटक केली.पुढील तपास सपोनि श्री.जे.सी. मुजावर हे करत आहेत.सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.अनिल कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर शहर यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि श्री.मधुकर साळवे,सपोनि जे. सी.मुजावर,सपोनि श्री.नितीन रणदिवे,पोसई श्री.समाधान सोळंके,पोहेकॉ/दत्तात्रय जपे,पोहेकॉ/सुनिल शिरसाट,पोना/संदिप धामणे,पोना/सुरज वाबळे,पोना/अविनाश वाकचौरे,पोना/वसीम पठाण, पोना/अहमद इनामदार,पोकॉ/दत्तात्रय कोतकर,पोकॉ/शिरीष तरटे,पोकॉ/सतीष त्रिभुवन,पोकॉ/ सचीन जगताप,पोकॉ/चेतन मोहीते व मोबाईल सेलचे पोकॉ/राठोड यांनी केली आहे.