१९ फेब्रुवारी रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी धनगर समाज सेवा संघाच्या वतीने भव्य वधू वर मेळाव्याचे नगर मध्ये आयोजन
अहमदनगर प्रतिनिधी (दि.११. डिसेंबर):-पुण्यश्लोक अहिल्यादेवी धनगर समाज सेवा संघ अहमदनगर कार्यकारिणीची बैठक नुकतीच सूर्यकांत फर्निचर , पाईपलाईन रोड येथील कार्यालयात संपन्न झाली. कोरोनामुळे सलग दोन वर्ष वधू वर मेळाव्याचे आयोजन करता आले नव्हते.परंतु येत्या १९ फेब्रुवारी रोजी भव्य असे वधू वर मेळाव्याचे आयोजन केले आहे.हा भव्य असा वधु वर मेळावा निर्मल नगर येथील गंगा लाॅन,पाऊलबुद्धे शाळेजवळ शिरसाट मळा येथे होणार असून समाजातील इच्छुक वधू-वरांनी व पालकांनी तालुका प्रतिनीधींशी व शहरातील प्रतिनिधींशी संपर्क करावा असे आवाहन ज्येष्ठ मार्गदर्शक पी.आर.शिंदे,अध्यक्ष राजेंद्र तागड,इंजि.राजेंद्र पाचे,हरिश्चंद्र करडे साहेब,दशरथ लांडगे सर, वसंतराव दातीर साहेब,डॉ.नामदेव पंडित,सूर्यकांत तागड,उपाध्यक्ष विजय शिपणकर,अनिल शिंदे,मयूर रहिंज,ज्ञानदेव घोडके,ज्ञानेश्वर भिसे,शरद धलपे सर यांनी केले आहे.