Maharashtra247

कत्तलीसाठी डांबलेल्या दहा गोवंशीय जनावरांची कर्जत पोलिसांनी केली सुटका

कर्जत प्रतिनिधी (दि.११. डिसेंबर):-अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कत्तलीसाठी एकत्रित डांबून ठेवलेल्या दहा गोवंशीय जनावरांची कर्जत पोलिसांनी मुक्तता केली आहे.दरम्यान या प्रकरणी अलिम इस्माईल कुरेशी,मुजाहित शकील कुरेशी,सोहेल गफार कुरेशी तिघेही (रा.राशीन,ता.कर्जत) या ३ आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम १२(अ) (ब) ९ व महाराष्ट्र प्राण्यांना वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ३,११ (१) घ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक/भगवान शिरसाठ,पोकॉ/भाऊसाहेब काळे,पोना/अमोल लोखंडे,पोकॉ/अर्जुन पोकळे यांनी केली आहे.

You cannot copy content of this page