Maharashtra247

वाळुंज बायपास येथील आरती हॉटेलवर नगर तालुका पोलिसांचा छापा देशी व विदेशी दारूचा मुद्देमाल केला जप्त

 

अहमदनगर प्रतिनिधी(दि.१५ जुन):-वाळुंज बायपास येथील आरती हॉटेलवर नगर तालुका पोलिसांनी छापा टाकून एकूण 46,252/- रुपयेचा देशी व विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त केला आहे.बातमीतील हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी श्री.शिशिरकुमार देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक, नगर ता.पोस्टे यांना नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध दारु विक्रीवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.त्यानुसार श्री. शिशिरकुमार देशमूख, सहायक पोलीस निरीक्षक, नगर तालुका पोलीस स्टेशन यांनी अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी पथक तयार केले.त्यानुसार सदर पथक हे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यावर करवाई करणेकामी पेट्रोलींग करीत असतांना श्री. शिशिरकुमार देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक यांना गुप्त बातमी मिळाली की,वाळुंज बायपास येथे सोलापूर रोडवर आरती हॉटेल येथे मोठया प्रमाणात देशी व विदेशी दारुची विक्री चालू आहे तुम्ही तात्काळ जावून त्याच्यावर कारवाई करा असा आदेश दिल्याने सदर पथक वाळुंज बायपास येथे जावून आरती हॉटेल येथे खात्री केली असता तेथे एक इसम देशी व विदेशी दारुची विक्री करताना दिसला सदर पथकाची खात्री पटताच आरती हॉटेलवर छापा टाकून इसम नामे उध्दव सोपान मोरे रा.वाळुंज ता. जिल्हा अहमदनगर यास ताब्यात घेवून तो बसलेल्या ठिकणाची झडती घेतली त्याठिकाणी एकुण 46,252/- रुपयेचे देशी व विदेशी दारुचा मोठया प्रमाणात साठा मिळून आला. त्याप्रमाणे पोकॉ/कमलेश पाथरुट यांनी नगर ता. पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.संपतराव भोसले,सपोनि/शिशिरकुमार देशमुख,पोउनि/युवराज चव्हाण,पोकॉ/कमलेश पाथरुट,जयदिप बांगर,सोमनाथ वडणे, संभाजी बारोडे,यांचे पथकाने केलेली आहे.

You cannot copy content of this page