Maharashtra247

जिल्हा रुग्णालयात केसपेपर साठी लागणाऱ्या रुग्णांच्या रांगा होणार आता कमी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.संजय घोगरे

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.१५ जुन):-आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत जिल्हा रुग्णालयात एक अभिनव उपक्रम घेण्यात आला.जिल्हा रुग्णालय येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली scan and share मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमे मध्ये रुग्णांची केसपेपर साठी लागणारी रांग कमी करण्यासाठी टोकन पद्धतीने केस पेपर दिले जात आहेत.त्यामुळे जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांच्या रांगा कमी तसेच वेळ पण वाचतोय त्यामुळे रुग्ण सुखावला आहे.यासाठी जिल्हारुग्णालय प्रशिक्षण केंद्रातील परिचारिका टोकन देऊन रुग्णाची एक प्रकारे सेवा करत आहे.तरी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाने याचा फायदा करून घ्यावा असे आव्हान जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.या मोहिमेत अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डावरे,डॉ.सुचेता यादव,डॉ.मनोज घुगे आणि अधिसेविका छाया जाधव आणि ओपिडी विभाग कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेऊन ही मोहीम यशस्वी करून जिल्हा रुग्णालय डिजिटल करण्यात आले.

You cannot copy content of this page