सकल हिंदू समाजाच्या वतीने नगर शहरात मूक मोर्चाचे आयोजन
अहमदनगर प्रतिनिधी (दि.१३.डिसेंबर):-सकल हिंदू समाजाच्या वतीने लव्ह जिहाद कायदा व्हावा यासाठी मूक मोर्चाचे नगर शहरामध्ये १४ डिसेंबर रोजी आयोजन केलेले आहे.गुजरात येथील काजल हिंदुस्तानी आणि मध्य प्रदेश येथील कालीचरण महाराज मोर्चात होणार सहभागी १४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिवाजी महाराज पुतळ्यापासून शहरातील प्रमुख रस्त्यावरून दिल्लीगेट पर्यंत हा मोर्चा येऊन येथेच मोर्चाचा समारोप होणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आले आहे.५० हजार आंदोलक या मोर्चात सहभागी होणार असून या मोर्चात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.