जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार केलेला आरोपी हरीमळा सोलापूर रोड येथून जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
नगर प्रतिनिधी (दि.१३. डिसेंबर):-अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला सराईत आरोपी सोलापुर रोड,हरीमळा,अहमदनगर येथुन जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.श्री. राकेश ओला पोलीस अधिक्षक यांनी पोनि/श्री.अनिल कटके,स्थागुशा यांना जिल्यातुन हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना चेक करुन जास्तीत जास्त हद्दपार आरोपी विरुध्द कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पथक हद्दपार आरोपींचा शोध घेत असताना पोनि/श्री.अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,आरोपी नामे दिनेश तुळशीराम वाघमारे(रा.हरीमळा,सोलापुर रोड,अहमदनगर)हा हद्दपार असताना लपुनछपून त्याचे घरी राहतो अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करून कारवाई करणेबाबत सुचना दिल्या.नमुद सुचना प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पथकातील सफौ/मनोहर शेजवळ,भाऊसाहेब काळे,पोहेकॉ/विजयकुमार वेठेकर,संदीप घोडके,देवेंद्र शेलार,विश्वास बेरड,पोना/शंकर चौधरी,लक्ष्मण खोकले,रवि सोनटक्के व पोकॉ/रणजीत जाधव अशांनी मिळून मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने आरोपीचे राहते घरी हरीमळा,सोलापुर रोड, अहमदनगर येथे जावुन घराचे आजु बाजुला सापळा लावुन थांबलेले असताना बातमीतील वर्णना प्रमाणे एक इसम दिसला पोलीस पथकाची खात्री होताच त्यास शिताफीने ताब्यात घेवून पोलीस पथकाची ओळख सांगितली व त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव पप्पु ऊर्फ दिनेश तुळशीराम वाघमारे(रा. हरीमळा,सोलापुर रोड, अहमदनगर) असे असल्याचे सांगितल्याने त्यास ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या हद्दपार आरोपी नामे दिनेश वाघमारे याने मा.उपविभागीय दंडाधिकारी,नगर विभाग यांचेकडील हद्दपार प्रस्ताव क्रमांक ०५/२०२१, दि.१७/०१/२०२२ अन्वये दोन (०२) वर्षे कालावधीसाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.हद्दपार आरोपीने हद्दपार आदेशाचा भंग करुन बेकायदेशिररित्या अहमदनगर भागामध्ये वास्तव्य करीत असताना मिळून आल्याने त्यांचे विरुध्द पोना/१७७२ लक्ष्मण चिंधु खोकले ने. स्थागुशा अहमदनगर याचे फिर्यादी वरुन भिंगार कॅम्प पोस्टे येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला असुन पुढील कार्यवाही भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक व श्री.अनिल कातकाडे उविपोअ नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.