हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केली पाहणी
नगर प्रतिनिधी (दि.१३. डिसेंबर):-सकल हिंदू समाजाच्या वतीने लव्ह जिहाद कायदा व्हावा यासाठी उद्या दि.१४ डिसेंबर रोजी मोर्चाचे आयोजन केलेले आहे.या होणाऱ्या मोर्चा संदर्भात श्री.राकेश ओला जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी मोर्चा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून कापड बाजार, चितळे रोड,दिल्लीगेट अशा भागाची पाहणी करून बंदोबस्तबाबत अधिकाऱ्यांना यावेळी सूचना दिल्या.यावेळी श्री.प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक,अहमदनगर श्री. कातकडे उपविभा.पो.अधि. शहर विभाग,श्री.अनिल कटके,पोनि/स्थानिक गुन्हे शाखा,श्री.संपतराव शिंदे,पोनि/कोतवाली पो.स्टे,श्रीमती.ज्योती गडकरी मॅडम तोफखाना पो.स्टे,श्री.वाघ,शहर वाहतूक शाखा,तसेच कोतवाली तोफखाना पोलीस ठाण्याचे गोपनीय पोलीस स्टाफ व कर्मचारी हजर होते.