संगमनेर येथून गोवंशीय जातीचे साठ हजार रुपये किमतीचे चार जनावरे स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात
अहमदनगर प्रतिनिधी (दि.१३. डिसेंबर):-महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जातीचे 60,000/- ( साठ हजार रु) किंमतीची विना चारापाणी बांधुन ठेवलेली चार (04) जिवंत जनावरे संगमनेर येथुन स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,यांनी पोनि/श्री.अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा,यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे दृष्टीने माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके,स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/दिनकर मुंडे,सफौ/मनोहर शेजवळ, पोहेकॉ/बापुसाहेब फोलाणे, संदीप घोडके,देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी,विशाल दळवी,राहुल सोळुंके,पोकॉ/रणजीत जाधव,रोहित येमुल, सागर ससाणे व चापोहेकॉ/उमाकांत गावडे अशांना बोलावुन कळविले की, आताच गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, संगमनेर येथील समनापुर गावचे शिवार एक इसम गोवंश जातीची जिवंत जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने बांधुन ठेवली आहेत आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.अनिल कटके यांनी लागलीच स्थागुशा पथकास बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.स्थागुशा पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी संगमनेर पोलीस स्टेशनचे अंमलदार यांचे मदतीने दोन पंचाना सोबत घेवुन समनापुर गावचे शिवारात मोकळ्या जागेत चारा पाणी न देता निर्दयतेने काही गोवंश जनावरे दावणीला बांधलेली दिसली. तेथे हजर असलेल्या इसमास पोलीस पथकाची ओळख सांगुन गोवंश जनावरे व जागे बाबत विचारपुस करता त्याने सदर जागा माझी पत्नी हिचे मालकीची आहे व गोवंश जनावरे कासिम आसद कुरेशी,रा.भारतनगर,ता. संगमनेर याचे मालकीची असुन त्याने सदर गोवंश जनावरे कत्तल करण्यासाठी येथे बांधुन ठेवलेली आहे अशी माहिती दिली.नमुद माहितीचे आधारे आरोपी नामे 1) कासिम आसद कुरेशी रा. भारत नगर,ता.संगमनेर (फरार) याचा आजु बाजूस व दिले पत्त्यावर जावुन शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही.आरोपी नामे कासिम आसद कुरेशी रा.भारत नगर, ता.संगमनेर याने त्याचे मालकिची 60,000/- रु. (साठ हजार रु.) किंमतीची चार (04) जिवंत गोवंश जनावरे विना चारापाणी दावणीला बांधलेली मिळुन आल्याने जप्त केली व सदर बाबत पोकॉ/2514 रणजीत पोपट जाधव,ने.स्थागुशा अहमदनगर यांचे फिर्यादी वरुन संगमनेर शहर पोलीस स्टेशन 1046/2022 महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम कलम 5 (अ), 1, 9 सह प्राण्यांना निर्दयतेने वागवणे कलम 3 व 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील कारवाई संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्रीमती.स्वाती भोर मॅडम,अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर,श्री.संजय सातव साहेब,उपविभागीय पोलीस अधिकारी,संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.