बहिरेपणाच्या शस्त्रक्रियांवरील खर्च कमी करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार खासदार डाॅ.सुजय विखेंची मेंटकाॅन परिषदेत ग्वाही; डाॅ.अशाेक गायकवाड लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित
नगर प्रतिनिधी (दि.१३.डिसेंबर):-माणसाचा प्रत्येक अवयव महत्त्वाचा असून, यात कान-नाक-घशाला (ईएनटी) अनन्यसाधारण महत्त्व आहे. या तिन्ही अवयवांवरील शस्त्रक्रिया अवघड असतात. यातच जन्मजात बहिरेपणाची (काॅक्लियर इप्लाट) शस्त्रक्रिया अवघड आणि मोठी खर्चिक असते.या शस्त्रक्रियेसाठी लागणारी औषधे आणि साहित्याचा खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी दिली. शिर्डी येथे नुकत्याच झालेल्या मेंटकाॅन परिषदेचे सचिव तथा कान-नाक-घसा तज्ज्ञ डाॅ. गजानन काशिद यांनी याबाबत माहिती दिली. फेडरेशन ऑफ महाराष्ट्र स्टेट ब्रांचेस ऑफ असाेसिएशनच्या ओटाेलरिंगाॅलाॅजीच्या अहमदनगर शाखेच्यावतीने ‘मेंटकॉन’ अंतर्गत काैशल्य विकासासाठी ५२ व्या राज्यस्तरीय ईएनटी (कान-नाक -घसा) परिषद शिर्डी येथे नुकतीच पार पडली. या परिषदेचे उद्घाटन खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले.शिर्डी येथे भरविण्यात आलेल्या मेंटकाॅन परिषदेचे त्यांनी काैतुक केले. बदलत्या अत्याधुनिक तंत्रज्ञानानुसार डाॅक्टरांचे ज्ञान अद्ययावत हाेण्यासाठी परिषदेचा ‘कौशल्य विकास ‘ हा विषय समर्पक असल्याचे खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. उद्घाटनावेळी परिषदेत सहभागी झालेल्या डाॅक्टरांशी त्यांनी संवाद साधला. यात डाॅक्टरांनी जन्मजात बहिरेपणा आणि त्यासारख्या इतर महागड्या शस्त्रक्रियांकडे लक्ष वेधले. महागडी औषधे, त्यावरील कर आणि आवश्यक साहित्यामुळे शस्त्रक्रिया अधिक खर्चिक झाल्या आहेत.त्यामुळे गरिबांना ह्या शस्त्रक्रिया परवडत नाही. त्यातून व्यंग अधिक वाढते, याकडे डाॅक्टरांनी लक्ष वेधले.यावर खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी या महागड्या शस्त्रक्रियांवरील खर्च कसा कमी करता येईल, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली.डाॅ.पद्मा कुलकर्णी आणि डाॅ. निलीमा गाेरे यांनी प्रास्ताविक केले. मेंटकाॅन परिषदेचे अध्यक्ष डाॅ. धनंजय कुलकर्णी यांनी स्वागत केले. या परिषदेत अहमदनगरमधील डाॅ. अशाेक गायकवाड यांना लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.मेंटकाॅनचे सचिव डाॅ.गजानन काशिद यांनी सांगितले,की परिषदेत महाराष्ट्रासह दिल्ली,कलकत्ता, राजस्थान, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक,केरळ येथून तब्बल ७०० डाॅक्टर सहभागी झाले हाेते.यात युवा डॉक्टरांची संख्या सर्वाधिक हाेती.या परिषदेमध्ये तब्बल साडेसहाशे प्रबंध सादर झाले असून,यामध्ये काैशल्य विकास विषयावर प्रत्येक परिषदेत सर्वांना सहभागी करून घेण्यात आले. याशिवाय शिर्डीच्या साईनाथ रुग्णालयातून ते परिषदेच्या ठिकाणी दूरदृश्यप्रणालीद्वारे १४ अवघड शस्त्रक्रिया करून दाखविण्यात आल्या. यात डाॅ. रेणुका ब्राटाे,डाॅ.सुजय जोशी,डाॅ.सतीश जैन, डाॅ. विजेयंद्र, डाॅ.टी.एन.जानकीराम,डाॅ.समीर भारगव, डाॅ. वीरेंद्र घैसास, डाॅ.क्षितिज पाटील, डाॅ.आशिष भूमकर, डाॅ.असिम देसाई, डाॅ.विकास अग्रवाल सहभागी झाले हाेते.पद्मश्री डाॅ.सेंड्रा देसा सुझा यांनी शिर्डी येथे झालेली ही परिषद देशातील कान-नाक-घसा डाॅक्टरांना सकारात्मक ऊर्जा देणारी ठरल्याचे सांगत आयोजकांचे काैतुक केले.परिषद यशस्वी केल्याबद्दल मेंटकाॅन अध्यक्ष डाॅ.धनंजय कुलकर्णी आणि सचिव डाॅ. गजानन काशिद यांना महाराष्ट्र स्टेट ब्रांचेस ऑफ असाेसिएशन ओटाेलरिंगाॅलाॅजीकडून सन्मानपत्राने गौरवण्यात आले. महाराष्ट्र असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. पुष्कर लेले, सचिव बाळासाहेब पाटील यांनी हा सन्मान केला.मेंटकाॅनचे सह- समन्वयक डाॅ. दिलीप पवार, खजिनदार डाॅ. याेगेश गेठे, सायंटिफिक चेअरमन डाॅ.अंजली फडके, डाॅ. अविनाश बडवे,डाॅ.शांताराम आढाव, डाॅ.अनिल कांबळे, डाॅ.रविंद्र कुलकर्णी, डाॅ.सोपान गाेरे, डाॅ. साेनाली बांगर, डाॅ.अशोक साेनांबेकर, डाॅ.एस. एस. नगरे, डाॅ. मधुसूदन मालपाणी, डाॅ. अरविंद जाेर्वेकर, डाॅ. भास्कर पवार, डाॅ.शाेभना गायकवाड, डाॅ. कल्पना गायकवाड, डाॅ. सुकेशनी गाडेकर, डाॅ.महावीर कटारिया, डाॅ. आनंद तुळजापुरे, डाॅ.निकुंज दातीर, डाॅ.प्रफुल्ल देशपांडे, डाॅ. वैजनाथ गुरवले, डाॅ.अनिल माेमले यांनी परिषदेच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.