निमगाव शाळेत माता-पालक मेळावा व हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात; महिलाशक्तीचा जागर, मातांचा जल्लोष!
श्रीरामपूर (वार्ताहर):-तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा निमगाव शाळेत माता पालक व हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात जिजामाता, सावित्रीबाई फुले,अहिल्याबाई होळकर,रमाई आंबेडकर,झाशीची राणी लक्ष्मीबाई,इंदिरा गांधी या थोर महिला शक्तीच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
माता पालक मेळाव्यात नर्स विजया निकम व अनिता पाचपिंड यांनी आहार व मातांचे आरोग्य यावर मार्गदर्शन केले.हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त संगीत खुर्ची,नृत्य स्पर्धा,उखाणे आदी मनोरंजक खेळ घेण्यात आले.प्रथम तीन क्रमांक विजेत्या मातांना बक्षीसे देण्यात आली.सर्व मातांना वाण देण्यात आले.शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सर्वांना चहा व पोहे अल्पोपहार देण्यात आला.कार्यक्रमानिमित्त पूजा निमसे व आरती निमसे यांनी सुंदर रांगोळी रेखाटली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश तरस,मुख्याध्यापक संतोष वाघमोडे,प्रतिभा तोरणे,मिना निकम,सुधा गमे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे नियोजन सुंदर केल्याबद्दल ग्रामस्थ व माता पालक भगिनींनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश तरस,ग्रामपंचायत सदस्या पूजा कालंगडे,कोमल परदेशी,संगिता काळे,जयश्री भागडे,अर्चना जिवरख,दिपाली पवार,मिराबाई साबळे,छाया धुळगंड,अर्चना भागडे,सोनाली रणनवरे,सोनाली परदेशी,जयश्री परदेशी,योगिता तरस,अनिता तरस,पूजा परदेशी,हिना आत्तार,दिपाली जाधव,आशाबाई चौधरी,सविता झुराळे,स्वाती दुशिंग,अनिता निमसे,सुनंदा कलंगडे,शोभा धुळगंड,अश्विनी आंबरे,मंगल त्रिभुवन,बिबी शेख,भारती गवळी,प्रियंका जाधव,सोनाली कडू, स्नेहल त्रिभुवन,अश्विनी पवार,राणी रोहम,निता जाधव,बबनबाई त्रिभुवन, मंगल काळे,वर्षा पठारे,शिवानी पंडित, धुळगंड आजी,अंगणवाडी सेविका अर्चना पंडित,अनिता काजळे,बेबीताई ढोबळे,आरती सोनवणे आदी माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधा गमे व मीना निकम यांनी केले.या स्तुत्य उपक्रमाबद्दल सरपंच दत्तात्रय झुराळे,उपसरपंच विजयसिंग परदेशी, गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे, शिक्षण विस्ताराधिकारी दिपक त्रिभुवन केंद्रप्रमुख बाबासाहेब पिलगर यांनी शाळेचे अभिनंदन केले.
