नगर प्रतिनिधी (दि.१२.डिसेंबर):-विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भिख मागून शाळा सुरू केल्याचे वक्तव्य करुन महापुरुषांचे अपमान केला.या वक्तव्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा अखिल भारतीय मेहतर समाज संघटना संपूर्ण राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.मेहतर समाज संघटनेचे वतीने जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक,यांना यावेळी निवेदन देण्यात आले.या वेळी सामाजिक कार्यकर्ते रवि मोरकरोसे,संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी खरारे, उपजिल्हाध्यक्ष,राहुल लखन, सामाजिक कार्यकर्ते संतोष सारसर,संघटनेचे कार्याध्यक्ष शुभम टाक,अनिल भालेराव,दिलिप सुर्यवंशी,पवन सेवक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Trending Topics:
Trending
- अहिल्यानगर पोलिसांची मान उंचावली! एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात व हवालदार राजू सुद्रिक यांच्या कर्तृत्वावर ‘अति-उत्कृष्ट सेवा पदका’ ची मोहोर
- घर देतो म्हणत साडेसहा लाखांची केली फसवणूक..न्यायालयाचा आदेश ही धुडकावला..अखेर त्या ३० वर्षीय आरोपीस LCB ने जेलमध्ये धाडला
- साईदरबारी दानाचा महासंगम! श्रावणाच्या मुहूर्तावर शिर्डीत सुवर्णवर्षाव; बंगळुरूच्या भक्ताकडून तब्बल २१ लाखांचे सोने,तर SBI बँकेकडून कडून ७० लाखांची अत्याधुनिक भेट!
- शहर वाहतूक पोलिसांचा धडाका! २७० बेशिस्त चालकांवर अडीच लाखांचा दंड;काळ्या काचा अन् ट्रिपल सीटला नो एन्ट्री! शहरातील दाळमंडई भागातही मोठी कारवाई
- 🔥गोदावरी नदीपात्रात LCB ची मोठी धाड..! ५ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त..वाळूमाफियांमध्ये प्रचंड खळबळ!
- काळ्या काचा लावून फिरणाऱ्यांना वाहतूक पोलिसांनी भररस्त्यात शिकवला धडा..!काळ्या काचा अन् नियमांची पायमल्ली करणाऱ्या १५२ गाड्यांवर कारवाई ५६ कारवरून फिल्म जागीच काढली..!
- कराड प्रशासनाचा हलगर्जीपणा ! महिलांचा सन्मान अन् नागरिकांचा जीव धोक्यात.’आदिशक्ती’ चा उपोषणातून पेटला वणवा!भटक्या कुत्र्यांची दहशत अन् रुग्णालयाची दुर्दशा उपोषणाचा आज दुसरा दिवस..!
- स्थानिक गुन्हे शाखेचे मध्यरात्री भयानक ‘कॉम्बिंग ऑपरेशन..हद्दपार सराईत गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह घेतलं ताब्यात;मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश!
