Maharashtra247

पदमशाली समाजाने बागुलपंडुगु सण वृक्षारोपण करून साजरा करावा मा.नगरसेविका सौ.वीणा बोज्जा;नगर शहरातील बागुल पंडुगु सण ७ जुलै ला साजरा होणार

 

नगर प्रतिनिधी(दि.५ जुलै):-पद्मशाली समाजाचा बागुलू पंडुगू सण म्हणजेच बागेचा सण म्हणून गेल्या कित्येक वर्षा पासून आषाड महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेनंतर साजरा केला जातो. याही वर्षी हा सण समाजाने वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करण्याची शपथ घेऊन साजरा करावा असे आवाहन मा. नगरसेविका सौ.वीणाताई बोज्जा यांनी एका पत्रकान्वये आवाहन केले आहे.या महिन्यातील 7 जुलै रोजी हा साजरा होत असून पद्मशाली समाजामधील बागुलू पंडूगू हा सण मोठ्या थाटात माटात समाजातील सर्व घटक एकत्र येऊन अहमदनगर शहरातील बालिकाश्रम येथील मंदिरात व सावेडी उपनगारातील श्रमिक नगर येथे साजरा केला जातो.या दिवशी पदमशाली समाजातील लोक देवीला सा प्रार्थना करून निसर्गाचे रक्षण करण्याचे तसेच पर्जन्यवृष्टी ही संतुलित प्रमाणात होण्यासाठी व दुष्काळ अगर अतिवृष्टी होऊ नये या साठी देवीला प्रार्थना केली जाते.या सणाला बागेचा सण म्हणून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध असून महाराष्ट्र मध्ये ज्या ज्या ठिकाणी पदमशाली समाजातील लोक राहतात त्या त्या ठिकाणी त्यांचे सोयीने हा सण साजरा केला जातो अशी माहिती सौ. वीणा बोज्जा यांनी दिली.

You cannot copy content of this page