शहरातील कोठला परिसरातून एक अल्पवयीन मुलगा व बोल्हेगाव येथून अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून नेले पळवून तोफखान्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल
अहमदनगर प्रतिनिधी(दि.४ जुलै):-बोल्हेगाव येथून एका अल्पवयीन मुलीला व कोठला परिसरातून एका अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.बोल्हेगाव येथे राहणार्या 40 वर्षिय महिलेलने सोमवारी (दि.3 जुलै) रोजी दुपारी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या 21 जून रोजी सकाळी कामावर गेल्या त्यावेळी त्यांच्या तिन्ही मुली घरीच होत्या सायंकाळी सहा वाजता त्या कामावरून घरी आल्यानंतर त्यांना घरात दोनच मुली दिसल्या.त्यांनी त्यांच्याकडे एका मुलीबाबत चौकशी केली असता ती सकाळी 10 वाजता घरातून बाहेर गेली असल्याचे त्यांना सांगितले गेले.दरम्यान, मुलीचा सर्वत्र शोध घेतल्यानंतरही ती मिळून न आल्याने त्यांनी 3 जुलै रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलीस मुलीचा शोध घेत आहेत.कोठला परिसरात राहणार्या एका 35 वर्षिय पुरूषाने मंगळवारी (दि.4) तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तयांचा 12 वर्षिय मुलगा सोमवारी (दि. 2) दुपारी साडे तीन वाजता घरी होता.तो गजराजनगर येथे जायचे आहे,असे म्हणत होता.दरम्यान,फिर्यादी यांनी त्याला गजराजनगर येथे जाण्यास विरोध केला व ते घराबाहेर निघून गेले.थोड्या वेळाने ते पुन्हा घरी आले असता त्यांना मुलगा घरात दिसला नाही.त्यांनी नातेवाईक व आसपास त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही.त्यानंतर फिर्यादी यांनी मंगळवारी तोफखाना पोलिसांना याबाबत माहिती देत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस मुलाचा शोध घेत आहेत.